Homeशैक्षणिक - उद्योग संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कामगारांना दहा टक्के पगार वाढ लागू

संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कामगारांना दहा टक्के पगार वाढ लागू

• कामगार युनियनच्यावतीने मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार
कोल्हापूर :
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कामगारांना दहा टक्के पगारवाढ लागू केली आहे. शासन प्रतिनिधी, राज्य कामगार प्रतिनिधी आणि कारखान्यांचे व्यवस्थापन प्रतिनिधी यांच्यामधील त्रिपक्षीय करारानुसार दि. १ नोव्हेंबर २०२५ पासून ही पगारवाढ लागू झाली. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना कामगार युनियनच्यावतीने मंत्री हसन मुश्रीफ यांचा कृतज्ञतापर सत्कार झाला.
मंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासमवेत झालेल्या चर्चेमध्ये कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांसह जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे, फायनान्स मॅनेजर संभाजी अस्वले,  कामगार कल्याण अधिकारी संतोष मस्ती आदी अधिकारी उपस्थित होते.
याबाबत बोलताना सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना कामगार युनियनचे अध्यक्ष मोहन पाटील म्हणाले, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रेरणेने आणि कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची नेत्रदीपक वाटचाल  सुरू आहे. शासन प्रतिनिधी, राज्य कामगार प्रतिनिधी आणि कारखान्यांचे व्यवस्थापन प्रतिनिधी  अशा त्रिपक्षीय करारानुसार कारखान्याने ही पगारवाढ लागू केली आहे. आम्ही समस्त कारखाना कर्मचारीवर्ग कारखाना व्यवस्थापनाचे ऋणी आहोत.
यावेळी युनियनचे अध्यक्ष मोहन पाटील, उपाध्यक्ष काशिनाथ घोडके, उपाध्यक्ष रघुनाथ पाटील, सहखजिनदार धोंडीराम पाटील, सहचिटणीस संजय पाटील, सहचिटणीस विजय गुरव, प्रकाश पदमले, सुभाष बोडके, सचिन गुरव, बाळासो पाटील, सुनील देसाई, अमृत पाटील, सुनील दिवटणकर, संदीप अरळगुंडकर, सागर प्रधाने, संतोष पोवार आदी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
mist
26 ° C
26 °
26 °
94 %
0kmh
40 %
Tue
27 °
Wed
27 °
Thu
27 °
Fri
28 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page