Homeशैक्षणिक - उद्योग ‘स्मॅक’च्या चेअरमनपदी जयदीप चौगले तर व्हाईस चेअरमन भरत जाधव

‘स्मॅक’च्या चेअरमनपदी जयदीप चौगले तर व्हाईस चेअरमन भरत जाधव

कोल्हापूर :
स्मॅकच्या २२व्या मासिक संचालक मंडळाच्या सभेत सन २०२५-२६ साठी नूतन कार्यकारिणीची निवड झाली. चेअरमनपदी जयदीप जयसिंगराव चौगले तर व्हाईस चेअरमनपदी भरत परशुराम जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
शिरोली औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक आणि कामगारवर्गाच्या आर्थिक, सामाजिक तसेच औद्योगिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली अग्रगण्य संस्था म्हणजे शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक) होय.
गेल्या पाच दशकांपासून उद्योगजगताच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेने उद्योग उभारणीपासून सामाजिक जबाबदारीपर्यंत अनेक उल्लेखनीय उपक्रम राबवले आहेत. सध्या संस्था आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असून, हा सुवर्ण प्रवास उद्योग, श्रम आणि सहकार्य यांचा गौरवशाली साक्षीदार ठरत आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या स्मॅकच्या २२व्या मासिक संचालक मंडळाच्या सभेत सन २०२५-२६ साठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
चेअरमनपदी चौगुले सिमेंट पाईप कंपनीचे जयदीप जयसिंगराव चौगले तर व्हाईस चेअरमनपदी सरोज ग्रुप ऑफ कंपनीजचे भरत परशुराम जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ऑन. सेक्रेटरीपदी भूमी एग्रीकल्चरल इम्प्लिमेंट्सचे रणजित चंद्रकांत जाधव तसेच ट्रेझररपदी श्री शुभम टर्निंग सेंटरचे बदाम लक्ष्मण पाटील यांची पुनर्निवड झाली. स्मॅक आयटीआय अध्यक्षपदी उषा इंटरप्रायझेसचे प्रशांत शिवाजीराव शेळके आणि स्मॅक क्लस्टर अध्यक्षपदी चौगुले इंडस्ट्रीजचे सुरेश लक्ष्मण चौगुले यांची निवड करण्यात आली आहे.
मावळते चेअरमन राजू तुकाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला संचालक सुरेन्द्र सोहनमल जैन, अतुल आनंदराव पाटील, नीरज नरेंद्र झंवर, सचिन सदाशिव पाटील, शेखर श्रीकांत कुसाळे आदी उपस्थित होते. शेवटी व्हाईस चेअरमन भरत जाधव यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
Mumbai
haze
27 ° C
27 °
27 °
61 %
0kmh
0 %
Sun
27 °
Mon
28 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page