कोल्हापूर :
गुजरीमध्ये एका छोट्याशा दुकानातून सुरू झालेला प्रवास आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला असून राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींग प्रा. लि., या नामांकित दागिन्यांच्या कंपनीने आपल्या अत्याधुनिक दागिन्यांच्या निर्मिती युनिटचे उदघाटन रविवारी शिरोली (कोल्हापूर) येथे झाले.
राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींग स्थापना सन १९७३ मध्ये हंजारीमल राठोड यांच्या पुढाकाराने झाली होती. व्यवसायाची सुरुवात राठोड परिवाराचे कुटुंबप्रमुख हंजारीमल राठोड यांनी गुजरी येथून एका छोट्या दुकानातून केली, पुढे जाऊन प्रतिभानगरमध्ये दागिने मॅन्युफॅक्चरिंग करिता एक छोटा कारखाना सुरू केला. त्यापुढे चंद्रकांत राठोड यांनी शिरोली येथे एका छोट्या युनिटमध्ये मॅन्युफॅक्चरिंगचे काम सुरू ठेवले, आणि त्यापुढे जयपूरमध्ये (राजस्थान) येथे त्यांनी एक अत्याधुनिक जयपूरची राजस्थानी ट्रेडिशनल ज्वेलरी बनवण्याचा कारखाना देखील सुरू केला आहे.
गेल्या पाच दशकांपासून उत्कृष्ट गुणवत्ता, विश्वासार्हता आणि नवकल्पनांमुळे राठोड ज्वेलर्स हे नाव दागिन्यांच्या जगतात अग्रस्थानी राहिले आहे. राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींग ही नवी अत्याधुनिक उत्पादन सुविधा कंपनीच्या उद्योजकीय वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा आहे. कंपनी आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुवर्ण ज्वेलरी ब्रँड्सना मोठ्या प्रमाणावर दागिन्यांचा पुरवठा करते. उपलब्ध माहितीनुसार, राठोड ज्वेलर्स मॅन्युफॅक्चरींग प्रा. लि. उच्च प्रतीचे सोन्याचे दागिने (उदा. अँटिक गोल्ड, अनकट डायमंड, पोलकीचे हार, कुंदन व जडाऊ दागिने, कष्टमाइज्ड डिझाइनर ज्वेलरी) असे विविध प्रकारचे दागिने उत्पादन करण्यासाठी ओळखली जाते.
नवीन ज्वेलरी उत्पादन कारखान्याच्या उदघाटन सोहळ्यास जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, आमदार राहुल आवाडे, माजी खासदार संजय मंडलिक, सुपरिटेंडेंट ऑफ़ पोलिस योगेश गुप्ता, मलाबार गोल्डचे व्हॉइस प्रेसिडेंट के. पी. अब्दुलसलाम, जॉयलुकासचे सुरेशभाई जैन, विविध मान्यवर, स्थानिक उद्योगपती तसेच राठोड परिवार आणि मित्रमंडळींची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी राठोड ज्वेलर्सच्या यशस्वी प्रवासाचे कौतुक करत, या नव्या अत्याधुनिक युनिटमुळे (कारखाना) कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक विकास आणि स्थानिक रोजगार निर्मितीस चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आणि कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे गौरवोद्गार काढले.
यावेळी राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींगचे मॅनेजिंग डायरेक्टर चंद्रकांत राठोड आणि त्यांच्या पत्नी रूपाली, कन्या रीवा, चिरंजीव हृदय यांचे अभिनंदन केले. गुजरीमधील छोट्या दागिन्यांच्या कारखान्यापासून ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरवठादार कंपनीपर्यंतच्या या यशस्वी वाटचालीवर मान्यवरांनी प्रकाश टाकला आणि कोल्हापूरच्या पारंपरिक सुवर्ण कारागिरीला आधुनिकतेची जोड देऊन जागतिक स्तरावर नेल्याबद्दल कौतुक केले.
——————————————————-
राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींगच्या अत्याधुनिक दागिने उत्पादन कारखान्याचे उदघाटन
RELATED ARTICLES
Mumbai
haze
27
°
C
27
°
27
°
61 %
0kmh
0 %
Sun
27
°
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

