Homeसामाजिकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून कागलमध्ये साकारले आकर्षक सेल्फी पॉईंट

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून कागलमध्ये साकारले आकर्षक सेल्फी पॉईंट

  • विभागनिहाय वैशिष्ट्यांची ओळख होतेय अधोरेखित
कोल्हापूर :
कागल शहरात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी व शहर स्वच्छ राहण्यासाठी नगरपरिषदेच्यावतीने ठिकठिकाणी आकर्षक सेल्फी पॉईंट्स साकारण्यात आले आहेत. यापूर्वी कचऱ्याचे ढीग साचणाऱ्या पाच ठिकाणी हे पॉईंट्स साकारण्यात आले आहेत. त्यामुळे शहर स्वच्छ राहण्यासही मदत होणार आहे. या उपक्रमामुळे शहराला एक नवे सौंदर्य लाभले आहे.
शहरातील प्रत्येक विभागातील सामाजिक, सांस्कृतिक, तसेच ओळख दर्शवणारे घटक लक्षात घेऊन हे सेल्फी पॉईंट्स उभारण्यात आले आहेत. ज्या भागात ज्या समाजाचे, संघटनेचे किंवा स्थानिक परंपरेचे प्राबल्य आहे, त्याच्याशी निगडित संदेश आणि प्रतिकात्मकता या सेल्फी पॉईंट्समध्ये दिसते. ज्या ठिकाणी कचरा पडतो व अस्वच्छता असते अशी ठिकाणे निवडून हे सेल्फी पॉईंट उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे शहर स्वच्छ राहण्यासाठीही मदत होणार आहे.
या उपक्रमातून कागलची सामाजिक एकता, प्रगतीशील विचार आणि सौंदर्यदृष्टी अधोरेखित झाली आहे. विविध रंगसंगती, आकर्षक लाईटिंग, स्थानिक घटकांचा वापर आणि जनसंपर्क वाढविणारी रचना यामुळे हे ठिकाण आता नागरिकांचे आवडते “फोटो स्पॉट” ठरणार  आहेत. नगरपरिषदेच्यावतीने  उभारण्यात आलेल्या या सेल्फी पॉईंट्समुळे कागल शहर अधिक आकर्षक बनले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
25 ° C
25 °
25 °
38 %
2.6kmh
0 %
Wed
25 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
27 °
Sun
27 °

Most Popular

You cannot copy content of this page