कोल्हापूर :
महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने केलेल्या आवाहनानुसार विवेकानंद कॉलेजने राज्यातील पूरग्रस्त भागातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा, जि. सोलापूर येथील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी विवेकानंद कॉलेजच्या प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थ्यांनी स्वइच्छेने पैसे देऊन सढळ हाताने मदत केली. एकूण १,२८,६३० रुपये इतकी रक्कम जमा झाली.
यावेळी प्रत्यक्ष करमाळा, सोलापूर येथील विविध भागात जाऊन प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त समितीने पाहणी करुन यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा, जि. सोलापूर येथील विद्यार्थ्यांना सॅक, वह्या व फराळाचे पदार्थ आदीचे वाटप केले. तसेच विद्यार्थ्यांच्या बँन्क खात्यावर प्रवास खर्च व कपडे खरेदीसाठी रक्कम वर्ग करण्यात आली.
यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना यानी पुढाकार घेतला. या उपक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. एस. पी. थोरात, आयक्युएसी समन्वयक डॉ. श्रुती जोशी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप पाटील, डॉ. एस. आर. कट्टीमनी, डॉ. ए. एस. कुंभार, डॉ. आरिफ महात, डॉ. एस एस. अंकुशराव, प्रा. ए. बी. वसेकर, रजिस्ट्रार एस. के. धनवडे यांनी केले.
विवेकानंद कॉलेजतर्फे करमाळा येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31
°
C
31
°
30.9
°
33 %
4.1kmh
20 %
Sun
30
°
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

