Homeशैक्षणिक - उद्योग गोकुळचे म्हैस दूध उत्पादन वाढवून २५ लाख लिटर संकलनाचा टप्पा गाठणार :...

गोकुळचे म्हैस दूध उत्पादन वाढवून २५ लाख लिटर संकलनाचा टप्पा गाठणार : मंत्री मुश्रीफ

कोल्हापूर :
गोकुळच्या दुधाची गुणवत्ता, चव आणि शुद्धता यामुळेच राज्यभर गोकुळच्या दुधाला प्रचंड मागणी आहे. पुणे-मुंबईसह इतर महानगरांतील ग्राहक नेहमी गोकुळच्या म्हैस दुधाचा दर्जा इतर म्हैस दूधापेक्षा उत्कृष्ट असल्याचे सांगतात. त्यामुळे या दर्जाचा सन्मान राखत अधिक उत्पादन आणि पुरवठा वाढवणे आपली सामुहिक जबाबदारी असून सर्वांच्या सहकार्याने गोकुळचे म्हैस दूध उत्पादन वाढवून २५ लाख लिटर संकलनाचा टप्पा गाठणार, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
गोकुळ दूध संघाच्यावतीने सुपरवायझर, महिला स्वयंसेविका तसेच सर्व विभाग प्रमुख यांची बैठक मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालयात पार पडली. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, गोकुळच्या ‘म्हैस’ दुधाला मुंबई-पुणे बाजारपेठेत सर्वाधिक मागणी आहे. या गुणवत्तेचा टिकाव ठेवणे आणि त्या प्रमाणात दूध पुरवठा वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी गोकुळचे सुपरवायझर बंधू, स्वयंसेविका व सर्व घटकांनी मनापासून प्रयत्न करणे गरजेचे आहे. सुपरवायझर हे गोकुळ आणि दूध उत्पादक यांच्यातील मुख्य दुवा आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील अल्पभूधारक व शेतमजूर वर्गातील दूध उत्पादकांना जातिवंत म्हैस खरेदीसाठी प्रोत्साहन द्यावे. केडीसीसी बँकेमार्फत कर्जपुरवठा करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. जिल्ह्यात दूधवाढीची क्षमता मर्यादित झाली असली तरी परराज्यातून जातिवंत म्हशी खरेदी करून उत्पादन वाढवणे आवश्यक आहे, असे मंत्री मुश्रीफ म्हणाले.
ते पुढे म्हणाले, वासरू संगोपन योजना तसेच आय.व्ही.एफ. संकल्पना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी गोकुळ प्रयत्नशील आहे. आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले, तर २० लाखांचा कलश पूजन करून २५ लाख लिटर संकलनाचा टप्पा गाठणे शक्य आहे.
याप्रसंगी गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले व केडीडीसीसी बँकेचे कार्यकारी संचालक गोरख शिंदे यांनी संघामार्फत व बँकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या म्हैस खरेदी योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली. बैठकी दरम्यान दुग्ध व्यवसायातील आधुनिक संकल्पना, म्हैस दुधाच्या संकलन वाढीच्या संधी व त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संचालक रणजितसिंह पाटील यांनी केले. चेअरमन नविद मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केले. किसन चौगले यांनी मनोगत व्यक्त केले. माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी आभार मानले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30 ° C
30 °
29.9 °
45 %
3.1kmh
0 %
Sun
29 °
Mon
28 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page