• कागल येथे एकात्मिक बाल विकास इमारत उदघाटन
कोल्हापूर :
लहान बालकांचे चांगले संगोपन झाल्याने मुले कुपोषित होणार नाहीत. अंगणवाडी आशा हे सर्वजण चांगले काम करतील असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प योजनाअंतर्गत, पंचायत समिती कागल येथे नूतन इमारतीच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले की, एकात्मिक बाल विकास सेवा योजना व प्रकल्प योजनेअंतर्गत इमारतीचे काम चांगले झाले असल्याने सर्व अधिकारीवर्गाचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले. या इमारतीमध्ये एकात्मिक बाल विकास अधिकारी कक्ष, कर्मचारी यांना बसण्यासाठी कक्ष, मीटिंग हॉल, किचन आणि स्वच्छतागृह अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या नूतन इमारतीमधून आशा वर्कर, अंगणवाडीचे सर्व कर्मचारी चांगले काम करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे म्हणाले की, या इमारतीमुळे आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांची चांगली सोय होणार आहे. यामुळे कामात सुसूत्रता येणार आहे. यापूर्वी मी अनेक ठिकाणी काम केले आहे. मात्र अशी इमारत कोठेही नाही. मंत्री मुश्रीफ यांच्यामुळे कागल तालुका सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे .
यावेळी अतिरिक्त कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. नूतन इमारतीच्या उदघाटनप्रसंगी अंगणवाडी सेविका, मदतनीस या शिदोरी घेऊन उपस्थित होत्या.
कार्यक्रमास तहसीलदार अमरदीप वाकडे, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, बालविकास अधिकारी जयश्री नाईक, गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद तारळकर आदींसह एकात्मिक बाल विकास विभागाचे अधिकारी वर्ग, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होत्या.
बालकांचे चांगलं संगोपन झाल्याने कुपोषण होणार नाही : मंत्री हसन मुश्रीफ
Mumbai
smoke
24
°
C
24
°
24
°
33 %
2.1kmh
0 %
Wed
29
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
27
°
Sun
28
°

