कोल्हापूर :
विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरच्या भौतिकशास्त्र विभागात फिजिक्स इन्स्पायर क्लब (पीआयसी) चे उदघाटन उत्साहात पार पडले. या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञानविषयक उपक्रम, संशोधनाची प्रेरणा आणि सर्जनशीलतेला चालना मिळणार असून, विज्ञानाची आवड अधिक जोपासली जाणार आहे. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांनी विज्ञानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये कायमस्वरूपी जिज्ञासा निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी विभागप्रमुख डॉ. संजय लठ्ठे यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
या क्लबचे ध्येय म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणे, नेतृत्वगुणांचा विकास घडवणे आणि संशोधनाची आवड वाढवणे, गेस्ट लेक्चर्स, कार्यशाळा, विज्ञान प्रदर्शन, स्पर्धा आणि नवकल्पनांना वाव देणारे उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विज्ञान चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे हे क्लबचे उद्दिष्ट असल्याचे विभागप्रमुख डॉ. संजय लठ्ठे यांनी सांगितले.
फॅकल्टी को-ऑर्डिनेटर्स म्हणून डॉ. जी. जे. नवाथे, डॉ. एस. आय. इनामदार, प्रा. अविनाश आर. गायकवाड, प्रा. अनुरथ गोरे, प्रा. प्रज्ञा पाटील आणि प्रा. मयुरी बराले हे कार्य पाहणार आहेत. तर विद्यार्थी समितीत अध्यक्षपदी कु. तेजस्विनी बनसोडे, उपाध्यक्ष आदिती कुंभार, सचिव ऋषी डोंगरे, संयुक्त सचिव ऋषिकेश राऊत, कोषाध्यक्ष सुदर्शन खुटाळे तसेच १० हून अधिक इव्हेंट को- ऑर्डिनेटर्सचा समावेश करण्यात आला आहे.
या उपक्रमासाठी विभागातील प्राध्यापकांसह गणेश माने, प्रशांत पाटील आणि पुंडलिक हरेर यांनी विशेष मेहनत घेतली. या उपक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षच्या डॉ. श्रुती जोशी, तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, सीईओ कौस्तुभ
विवेकानंद कॉलेजमध्ये फिजिक्स इन्स्पायर क्लबचे उदघाटन
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24
°
C
24
°
24
°
33 %
2.1kmh
0 %
Wed
29
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
27
°
Sun
28
°

