• डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या संशोधकांचे यश
कोल्हापूर :
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडीसीप्लेनरी स्टडीजच्या स्टेम सेल अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन विभागातील संशोधक विद्यार्थ्यांनी ‘सुपर बोन ग्लू’ विकसित केला आहे. या ग्लूच्या मदतीने केवळ २ मिनिटांत गंभीर हाडांचे फ्रॅक्चर तसेच तुटलेले हाडांचे तुकडे जोडता येतात. याशिवाय उपयोग जखम झालेल्या ठिकाणची त्वचा भरून काढण्यासाठीही सुपर बोन ग्लूचा उपयोग होऊ शकतो.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शिवाजी बी. कास्टे आणि संशोधक विद्यार्थिनी निकिता अमर शिंदे यांनी हा सुपर बोन ग्लू विकसित केला. संशोधन संचालक आणि अधिष्ठाता प्रा. सी. डी. लोखंडे यांचे या दोघांना मार्गदर्शन लाभले.
हे सुपर बोन ग्लू नैसर्गिक पॉलिमरपासून बनवले गेले असून ते पूर्णपणे सुरक्षित आणि नॉन-टॉक्सिक आहे. हाडे जोडल्यावर हे ग्लू शरीरात शोषले जाते, त्यामुळे नंतर इम्प्लांट काढण्यासाठी स्वतंत्र शस्त्रक्रियेची गरज राहत नाही. या ग्लूच्या वापरामुळे हाड जोडताना मेटल रॉड किंवा स्क्रू लावण्याची आवश्यकता उरत नाही. त्यामुळे हाडे जोडण्याची प्रक्रिया अधिक सोपी होते. हाडांच्या शस्त्रक्रियेसाठी हे सुपर बोन ग्लू अतिशय सहज लावता येते. यामुळे मानवी शरीरावर कोणत्याही प्रकारची अॅलर्जी किंवा प्रतिकूल प्रतिक्रिया होत नाही. तसेच हा ग्लू अत्यंत रोगप्रतिकारक असल्याचे सिद्ध झाले आहे.
हे सुपर बोन ग्लू (डिंक) विकसित केल्यानंतर त्याची प्रि-क्लिनिकल टेस्टिंग करण्यात आली आहे. त्यामध्ये हे ग्लू हिमो-कॉम्पॅटिबल आणि सायटो-कॉम्पॅटिबल असल्याचे सिद्ध झाले. तसेच विस्टर रॅट या प्रजातीवर केलेल्या चाचण्यांमध्ये हे सुपर बोन ग्लू बायोकॉम्पॅटिबल असल्याचेही स्पष्ट झाले आहे. यामध्ये ऑस्टिओइंडक्टिव्ह आणि ऑस्टिओकंडक्टिव्ह ही मुख्य वैशिष्ट्ये असून ते तुटलेली हाडे जलदगतीने दुरुस्त आणि पुनरुत्पादित करण्यास मदत करते. हे ग्लू अवघ्या २८ दिवसांत मानवी शरीरात पूर्णपणे विघटीत होते आणि ज्या जागी इजा झाली आहे त्या ठिकाणी नवे हाड तयार होण्यास सुरुवात होते.
मेटल इम्प्लांट्सच्या तुलनेत हे तंत्रज्ञान अधिक फायदेशीर असून ते रुग्णांच्या वेदना कमी करण्यात आणि उपचाराची प्रक्रिया सोपी करण्यात मदत करते. हे तंत्रज्ञान लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी सुरक्षित व उपयुक्त ठरणार आहे, ज्यामुळे मेटल इम्प्लांट्समुळे होणारा धोका टाळता येऊ शकतो.
या सुपर बोन ग्लूचे इंडियन पेटंट देखील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून नोंदविण्यात आले आहे. या संशोधनामध्ये सहयोगी प्राध्यापक डॉ. शिवाजी बी. कास्टे आणि संशोधक विद्यार्थिनी निकिता अमर शिंदे यांनी परिश्रम घेतले आणि हा सुपर बोन ग्लू विकसित केला. तसेच संशोधन संचालक आणि अधिष्ठाता प्रा. सी. डी. लोखंडे यांनी मार्गदर्शन केले.
या सर्व संशोधकांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त व शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.
——————————————————-
तुटलेली हाडे जोडणारा ‘सुपर बोन ग्लू’ विकसित
Mumbai
smoke
24
°
C
24
°
24
°
46 %
2.1kmh
0 %
Tue
29
°
Wed
28
°
Thu
29
°
Fri
28
°
Sat
26
°

