कोल्हापूर :
या दिवाळीत रिलायन्स ज्वेल्सने नवीन फेस्टिव कलेक्शन लॉन्च केले. यावेळी बॉलिवूड आयकॉन रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा ठडानी यांनी प्रथमच एकत्रित ब्रँड डेब्यू केला आहे. आई-मुलगी ही जोडी परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ दाखवत असून, भारतीय दागिन्यांची परंपरा आणि आजच्या ट्रेंड्स यांचा संगम ग्राहकांसमोर आणत आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ग्रुप सीएमओ गायत्री यादव यांनी सांगितले की, भारतीयांचे सोन्याशी भावनिक नाते कायमच विशेष राहिले आहे. आमचे नवीन दिवाळी कलेक्शन हेच दाखवते – जिथे परंपरा आणि आधुनिकता हातात हात घालून चालतात. रवीना आणि राशा या दोघी ब्रँडसोबत जोडल्यामुळे आम्ही दोन पिढ्यांशी थेट नाते जोडत आहोत.
या कलेक्शनमध्ये लक्ष्मीप्रेरित आकृत्या, रांगोळी, कमळ, मोर, झेंडूची फुले, दिये अशा डिझाइन्स सोनं आणि हिऱ्यांमध्ये साकारले गेले आहेत. यात आकर्षक कानातले, चोकर, लांब हार, बांगड्या आणि अंगठ्या यांचा समावेश आहे.
आपली भावना व्यक्त करताना रवीना टंडन म्हणाली, मी रिलायन्स ज्वेल्ससोबत हा नवीन प्रवास सुरू करण्याबद्दल खूप उत्साहित आहे. हे कलेक्शन परंपरा आणि आधुनिकतेचा अप्रतिम संगम दाखवते.
राशा ठडानीने सांगितले, दागिने हे प्रत्येक प्रसंगी व्यक्तिमत्त्व आणि स्टाईल दाखवण्याचे माध्यम आहेत. हे कलेक्शन मला माझ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख जपण्याची आणि सणाचा उत्साह व्यक्त करण्याची संधी देते.
ग्राहकांसाठी या दिवाळीत रिलायन्स ज्वेल्सने आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. १००% जुना सोन्याचा एक्सचेंज व्हॅल्यू, सोन्याच्या दागिन्यांवर मेकिंग चार्जेसवर ४५% पर्यंत सूट आणि हिऱ्यांच्या दागिन्यांवर व मेकिंग चार्जेसवर ३५% पर्यंत सूट. या ऑफर्स २ नोव्हेंबर २०२५ पर्यंत लागू असतील. संपूर्ण कलेक्शन देशभरातील १४०+ रिलायन्स ज्वेल्स शोरूम्समध्ये उपलब्ध आहे.
——————————————————-
रिलायन्स ज्वेल्सने सादर केले दिवाळी कलेक्शन
Mumbai
haze
24
°
C
24
°
24
°
69 %
3.6kmh
0 %
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°
Fri
26
°

