Homeसामाजिकदिव्यांगांचे जीवन आनंदी आणि सुकर करण्याचा माझा ध्यास : मंत्री हसन मुश्रीफ

दिव्यांगांचे जीवन आनंदी आणि सुकर करण्याचा माझा ध्यास : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर :
दिव्यांग नागरिकांच्या हालअपेष्टा बघितल्यानंतर मला अंत:करणापासून वेदना होतात. म्हणूनच दिव्यांगांचे जीवन आनंदी आणि सुकर करण्यासाठी माझी धडपड असते. दिव्यांगांचे जीवन आनंदी आणि सुकर करण्याचा आनंद फार मोठा आहे असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कागल पंचायत समितीच्यावतीने सामाजिक न्याय व सक्षमिकरण मंत्रालय दिव्यांगजन सशक्तिकरण विभागाच्यावतीने एडीपी योजनेअंतर्गत ४७७ दिव्यांगांना  मोफत सहाय्यक उपकरण वाटप करण्यात आले.
मंत्री हसन मुश्रीफ पुढे म्हणाले, सुदृढ लोकांना थोड्या जरी वेदना झाल्या आणि एखादा अवयव दुखू लागला तर चैन पडत नाही. मग, जन्मापासूनच अपंग व्यक्तींचे  जीवन कसे हालाकीचे असेल याचा विचार करा. अशा लोकांना आधार देण्याची गरज आहे. परमेश्वराने अशा परिस्थितीत त्यांना पाठवले त्यांचे जीवन कसे सुकर होईल यासाठी माझा प्रयत्न आहे.
स्वागत व प्रास्ताविक गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांनी केले. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24 ° C
24 °
24 °
46 %
2.1kmh
0 %
Tue
29 °
Wed
28 °
Thu
29 °
Fri
28 °
Sat
26 °

Most Popular

You cannot copy content of this page