Homeसामाजिकशेतकऱ्यांसाठी महाविस्तार एआय ॲप

शेतकऱ्यांसाठी महाविस्तार एआय ॲप

कोल्हापूर :
शेतकऱ्यांना हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून महाविस्तार एआय हे अँप लाँच केले आहे. हे कृषी विभागाने विकसित केलेले एक अत्याधुनिक ॲप आहे. कृत्रिम बुद्धिमतेच्या साहाय्याने हे अँप शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध करून देते. मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे अँप शेतकऱ्यांना रिअल टाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला आणि आधुनिक शेती पद्धतींचे मार्गदर्शन करते.
महाविस्तार एआय अँपमधील एआय चॅटबॉट शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे देते. रिअल-टाइम हवामान अंदाज, स्थानिक पातळीवरील हवामान अंदाजामुळे शेतकरी  पेरणी, कापणी आणि खतांचा वापर यांचे नियोजन करू शकतात. स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे भाव रिअल-टाइममध्ये दाखवते. कृषि विभागाच्या विविध कृषी योजनांची माहिती, अनुदान, आणि विमा योजनांचे तपशील एकाच ठिकाणी मिळू शकतील. ॲपमध्ये मराठीत व्हिडिओ उपलब्ध आहेत. ज्यात पिकांची लागवड, खतांचा वापर, कापणी, आणि जैविक शेती  याबाबत तपशीलवार मार्गदर्शन मिळेल. अँपमधील एआय तंत्रज्ञानमध्ये शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करून पिकांवरील रोग आणि किडींचे निदान करुन उपाय मिळवू शकतात.
महाविस्तार एआय ॲप शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य बनवण्यासाठी अनेक फायदे घेऊन आले आहे. चुकीच्या खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर टाळून शेतकरी उत्पादन खर्च कमी करू शकतात. बाजारभाव माहिती आणि हवामान अंदाजामुळे शेतकरी योग्यवेळी पिकांची विक्री आणि नियोजन करू शकतात. यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.
गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आजच महाविस्तार एआय ॲप डाउनलोड करा आणि शेतीत डिजिटल क्रांतीचा भाग व्हा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28.2 ° C
28.2 °
28.2 °
62 %
8.8kmh
3 %
Sat
28 °
Sun
30 °
Mon
31 °
Tue
29 °
Wed
29 °

Most Popular

You cannot copy content of this page