कोल्हापूर :
रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या ‘यामिनी’ या प्रदर्शनाचे उदघाटन डी. वाय. पाटील ग्रुपच्या सौ. शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते फित कापून झाले. हॉटेल सयाजी येथे शुक्रवारी या प्रदर्शनास उत्साहात प्रारंभ झाला. उदघाटनप्रसंगी रोटरीचे डिस्ट्रिक गव्हर्नर अरुण भंडारी,असिस्टंट गव्हर्नर हर्षवर्धन तायवडे पाटील, रोटरी मुव्हमेंट कोल्हापूरचे प्रेसिडेंट शितल दुगे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डिस्ट्रिक गव्हर्नर अरुण भंडारी यांनी रोटरी क्लबचा इतिहास सांगितला.आणि रोटरी क्लब ऑफ गार्गीजने अनेक विधायक उपक्रम राबविण्यावर नेहमीच भर दिलेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गरजूंना सहकार्य केलेले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विधायक कामासाठी निधी दिला जाणार असल्याचे सांगितले.
हे प्रदर्शन २१ सप्टेंबर २०२५ पर्यंत चालू राहणार आहे. यावर्षीच्या यामिनी प्रदर्शनाचे हे बारावे वर्ष आहे. या प्रदर्शनात पुणे येथील एक्सकॅलुसिव्ह रिअल ज्वेलर्स विथ युनिक डिझाइन्स, मुंबई पोल्की, रिअल डायमंड्स, लॅबग्रोन डायमंड्स, संपूर्ण भारतामधील तसेच इंदोर, जयपूर, गोआ, बेंगलोर, दिल्ली येथील विविध प्रकारच्या होम डेकोर्स फॉर फेस्टीव्हस स्टॉल्स असे १०० हुन अधिक स्टॉल्स सहभागी झाले आहेत.
या प्रदर्शनासाठी क्लबच्या अध्यक्षा अंजली मोहिते, को चेअरमन डॉ. हेमलता कोटकर, चेअर पर्सन बिना जनवाडकर, सेक्रेटरी सविता पदे, सौ. साधना घाटगे, शोभा तावडे याचबरोबर यामिनीच्या सदस्य रेणुका सप्रे, दीपिका कुंभोजकर, कल्पना घाडगे, गीता पाटील, योगिनी कुलकर्णी, जया महेश्वरी, सुरेखा इंग्रोळे, सुजाता लोहिया, गिरिजा कुलकर्णी, नंदिनी पटोडीया यांच्याचबरोबर सर्व क्लब मेंबर्सनी अथक परिश्रम घेतले आहेत.
रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या ‘यामिनी’ प्रदर्शनास उत्साहात प्रारंभ
Mumbai
smoke
28
°
C
28
°
28
°
39 %
2.6kmh
0 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
27
°
Sat
27
°
Sun
28
°

