• देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे सभागृहात ४ ऑक्टोबरला पुरस्कार सोहळा
कोल्हापूर :
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्यावतीने देण्यात येणारा ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती’ पुरस्कार यावर्षी मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीसह मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, शनिवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता गायन समाज देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. शाल, श्रीफळ, मानपत्र व ५१ हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अशोक सराफ यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ यावेळी उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी अभिनेते व निवेदक विघ्नेश जोशी हे अशोक सराफ व निवेदिता सराफ यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.
या कार्यक्रमाला अभिनेते मोहन जोशी, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर तसेच मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री हसन मुश्रीफ आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पत्रकार परिषदेला नाट्य परिषद कोल्हापूर शाखेचे कार्याध्यक्ष आनंद कुलकर्णी, गिरीश महाजन, किरण कांबळे, शिवकुमार हिरेमठ, हेमसुवर्णा मिरजकर आदी उपस्थित होते.
——————————————————-
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना केशवराव भोसले पुरस्कार जाहीर
RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
28.2
°
C
28.2
°
28.2
°
56 %
4.5kmh
49 %
Sat
28
°
Sun
30
°
Mon
31
°
Tue
29
°
Wed
28
°

