Homeसामाजिकरोटरी क्लब ऑफ गार्गीजचे 'यामिनी' प्रदर्शन शुक्रवारपासून

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे ‘यामिनी’ प्रदर्शन शुक्रवारपासून

कोल्हापूर :
दसरा – दिवाळी जवळ येताच कोल्हापूरच्या जनतेला वेध लागतात ते ‘यामिनी’ या प्रदर्शनाचे. दरवर्षीच्या वाढत्या प्रतिसादामुळे रोटरी क्लब ऑफ गार्गीजने हे प्रदर्शन १९, २०, २१ सप्टेंबर २०२५ रोजी मेघमल्हार हॉल, सयाजी हॉटेल, कोल्हापूर येथे आयोजित केले असल्याची माहिती क्लब अध्यक्षा सौ. अंजली मोहीते, इव्हेन्ट चेअरमन बिना जनवाडकर, को-चेअरमन डॉ. हेमलता कोटकर, सेक्रेटरी सविता पदे, रोटरी सदस्य सौ. साधना घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या.
यामिनी प्रदर्शनाचे हे १२वे यशस्वी वर्ष असून यावर्षी प्रदर्शनात पुणे येथील एक्सकॅलुसिव्ह रिअल ज्वेलर्स विथ युनिक डिझाइन्स, मुंबई पोल्की, रिअल डायमंड्स, लॅबग्रोन डायमंड्स, संपूर्ण भारतामधील तसेच इंदोर, जयपूर, गोवा, बेंगलोर, दिल्ली येथील विविध प्रकारच्या होम डेकोर्स फॉर फेस्टीव्हस स्टॉल्स असे १०० हुन अधिक स्टॉल्स असलेले हे यामिनी प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उदघाटन शुक्रवारी (दि.१९) दुपारी ४ वाजता डी. वाय. पाटील ग्रुपच्या सौ. शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार सतेज पाटील, डी. वाय. पाटील ग्रुपचे संजय डी. पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, डिस्ट्रिक गव्हर्नर अरुण भंडारी, असिस्टंट गव्हर्नर हर्षवर्धन तायवडे पाटील, रोटरी मुव्हमेंट कोल्हापूरचे प्रेसिडेंट रो. शितल दुगे यांची उपस्थिती असणार आहे.
आजपर्यंत रोटरी क्लब ऑफ गार्गिजने विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. अनेक गरजूंना मदत केली आहे. शिवाय समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची उमेद देणे हा मुख्य उद्देश प्रदर्शनाचा असतो. त्यामुळे बचत गट यांनीही बनविलेल्या वस्तू प्रदर्शनात बघायला मिळणार आहेत. या प्रदर्शनातून उपलब्ध निधीतून विविध सामाजिक उपक्रम, महिला सबलीकरण, गरजूंसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, मुलींसाठी सर्वाइकल कॅन्सरचे वैक्सिंग, पोलिओ मुक्तीसाठी रोटरी समूहाचा सिंहाचा वाटा आहे. महिलांसाठी उपयुक्त असणारी माहिती मिळावी यासाठी  चर्चासत्र आयोजित केले जातात. सामाजिक भान ठेऊन सामजिक प्रकलप राबविण्यावर अधिक भर दिला जातो. अशा विविध उपक्रमासाठी निधी वापरला जातो. शिवाय कॅन्सर सेंटरलाही मशिनरी दिलेली आहे. त्याचा उपयोग कॅन्सर रुग्णांना होत आहे.
या प्रदर्शनासाठी क्लबच्या अध्यक्षा अंजली मोहिते, को चेअरमन डॉ. हेमलता कोटकर, चेअर पर्सन बिना जनवाडकर, सेक्रेटरी सविता पदे, सौ. साधना घाटगे, शोभा तावडे याचबरोबर यामिनीच्या सदस्य रेणुका सप्रे, दीपिका कुंभोजकर, कल्पना घाडगे, गीता पाटील, योगिनी कुलकर्णी, जया महेश्वरी, सुरेखा इंग्रोळे, सुजाता लोहिया यांच्यासह सर्व क्लब मेंबर्सनी अथक परिश्रम घेतले आहे.
हे प्रदर्शन १९ सप्टेंबरला दुपारी ४ ते रात्री ९ आणि २० व २१ सप्टेंबरला सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आहे. तरी सर्व कोल्हापूरवासीयांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्यावतीने पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
mist
26 ° C
26 °
25.9 °
89 %
1.5kmh
75 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page