कोल्हापूर :
ऑल महाराष्ट्र थांग-ता असोसिएशन च्यावतीने १९ ते २१ सप्टेंबर २०२५ दरम्यान गंगोत्री भवन, परतवाडा, जिल्हा अमरावती (महाराष्ट्र) येथे २९वी राज्य थांग – था चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धा होणार आहे.
इंडियन मार्शल आर्ट थांग – ता असोसिएशन कोल्हापूर संलग्न ऑल महाराष्ट्र थांग – ता असोसिएशन च्यावतीने १६वी जिल्हास्तरीय सब ज्युनियर, ज्युनियर, सीनियर वयोगट वजन गटाप्रमाणे स्टाईल १, स्टाईल २ या प्रकारात घेण्यात आल्या. या जिल्हास्तरीय थांग – ता स्पर्धेचे उदघाटन प्रेम भोसले यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संस्थापक अविनाश पाटील, असोसिएशनचे सचिव सतीश वडणगेकर, शहानवाज नदाफ उपस्थित होते.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटना अध्यक्ष किरण मोरे, क्रीडाशिक्षक विश्वनाथ जांभळे, पवन टिपुगडे, अमर मिरजे, दीपक सुतार, शर्वरी गायकवाड यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक हातकणंगले तर द्वितीय क्रमांक शिरोळ आणि तृतीय क्रमांकाचा शाहूवाडी तालुका मानकरी ठरला.
१६ वी जिल्हास्तरीय सब ज्युनियर, ज्युनियर, सीनियर, थांग – ता चॅम्पियनशिप २०२५-२६ निकाल पुढीलप्रमाणे आहे.
• सब ज्युनियर स्टाईल १- मुले : सुवर्णपदक-
समर्थ सौंदलगे, गौतम निलजकर, रुद्र यादव, अथर्व चव्हाण, श्रेयश माळवदे, विराज कुंभार यशराज भोसले, पृथ्वीराज मोरे. मुली : ईश्वरी पाटील, आफिया नदाफ, तेजस्विनी खंदे, स्तुती बिरांजे.
• रौप्यपदक – मुले : निशांत पाटील, रोहित माळी, श्रीरंग लोहार, जोहान सुतार. मुली : राजनंदिनी कुंभोज.
• कास्य पदक – मुले : ऋतुराज शकते, वेद मगदूम.
सब ज्युनियर स्टाईल २- सुवर्णपदक
उत्कर्ष कांबळे, पियुष कांबळे, शर्विल माळी, सिद्धेश जाधव, देवराज मेघने, सुजल कवडे,हपृथ्वीराज चव्हाण, सिफान, डांगे सोहम राऊत, मुली : अशिही अनुसे,
• रौप्यपदक : अक्षय बंडगर, रोहन माळी, जोहेल कदम, कास्य पदक : आयुष लोखंडे
• ज्युनियर मुले स्टाईल १: सुवर्णपदक – आदिराज मॅडले, रजत पेटकर, श्रेणिक नारगुंडे, सुयश कंदलकर, शुभम गोसावी, अथर्व धनवडे, मयुरेश परीट, चैतन्य कोरे, नवेद बाबर, प्रथमेश बाबर.
• रौप्यपदक मुले : सार्थक हेरवाडे, आर्यन गवळी, साहिल पाटील, शिवाजी देवणे,
• कास्यपदक मुले : सुदर्शन कोळी.
• ज्युनियर स्टाईल २ – सुवर्णपदक मुले : द्वारकेश चव्हाण, समर्थ माळी, विपुल जाधव, साहिल संकपाळ, आर्यन माळी, अथर्व पाटील, ओम राऊत, स्वप्निल कांबळे, अफरार पटेल,यथार्थ पवार.
• रौप्यपदक : पृथ्वीराज फडतरे.
• सीनियर स्टाईल १- सुवर्णपदक – आयुष पोरे, निशांत लाड, सर्वेश शिंदे, अथर्व चौगुले, स्वयम दिवसे.
• सीनियर मुले स्टाईल २ – सुवर्णपदक : सम्मेद पाटील, राजवर्धन पाटील, पियुष खोत, अभिराज सलगर, शौर्य चौगुले, पार्श्व चौगुले.
वरील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची अमरावती (महाराष्ट्र) येथे होणाऱ्या २९व्या राज्य थांग – था चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अमरावती येथे २९वी राज्य थांग – था चॅम्पियनशिप स्पर्धा
RELATED ARTICLES
Mumbai
mist
26
°
C
26
°
25.9
°
89 %
1.5kmh
75 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°