Homeशैक्षणिक - उद्योग सातारा जिल्हास्तरीय युवा महोत्सवात किसन वीर महाविद्यालयाचे यश

सातारा जिल्हास्तरीय युवा महोत्सवात किसन वीर महाविद्यालयाचे यश

• मध्यवर्ती युवा महोत्सवासाठी किसन वीर महाविद्यालय पात्र
  कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विद्यार्थी विकास विभाग व रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच ४५ वा सातारा जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या युवा महोत्सवात जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाने चार कलाप्रकारात सहभाग नोंदवून तीन पारितोषिके प्राप्त केली. विशेषतः किसनवीर महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातील कु. सायुरी उमेश सणस या विद्यार्थिनीने वकृत्व स्पर्धेत दोन पारितोषिके प्राप्त केली. त्यामध्ये वकृत्व स्पर्धा (इंग्रजी) द्वितीय क्रमांक व वकृत्व स्पर्धा (मराठी) तृतीय क्रमांक या पारितोषिकांचा समावेश आहे. तर लोककला या कलाप्रकारात मंगळागौरी या नृत्यास तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
यामुळे दिनांक १८ ते २० सप्टेंबर २०२५ दरम्यान शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज येथे आयोजित करण्यात येणाऱ्या मध्यवर्ती युवा महोत्सवासाठी किसन वीर महाविद्यालय पात्र झाले आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांच्या हस्ते व रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. (डॉ) ज्ञानदेव झांबरे यांच्या विशेष उपस्थितीत पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कला व सांस्कृतिक विभागाचे समन्वयक प्रा. (डॉ) अंबादास सकट, डॉ. संदीप वाटेगावकर, विनायक कांबळे, सौ. रेश्माबानो मुलाणी, श्रीमती पुजा इंदलकर स्पर्धेच्या ठिकाणी टीम मॅनेजर म्हणून उपस्थित राहिले.
मंगळागौरी या नृत्यप्रकारात रसिका खंडागळे, गायत्री राऊत, सायली कांबळे, भूमी शेलार, साक्षी वाडकर, अनुष्का गोळे, सायली तरडे, धनश्री खरात, संचिता चोरट या मुलींनी सहभाग घेतला. डॉ. मंजुषा इंगवले, डॉ. शिवाजी ताटे व शीतल ताटे यांनी देखील कार्यक्रमस्थळी विशेष उपस्थिती दर्शवत सहभागी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविला. राजू संकपाळ यांनी मंगळागौरी या नृत्यासाठी कोरिओग्राफर म्हणून काम पाहिले.
स्पर्धेच्या नियोजनामध्ये डॉ. राजेश गावित, सौ. दिपाली चव्हाण, श्रीमती कांचन मोरे, सुमंत सावंत, संतोष मुळीक, सानिया काझी, अमरीन इनामदार, नितीन शिंदे, सुष्मिता शिंदे, अमृता वाशिवाले, प्रियंका वाळकोली, सानिका पिसाळ आदींनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
34 ° C
34 °
29.9 °
17 %
3.6kmh
1 %
Wed
34 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
27 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page