Homeसामाजिकवृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सप्टेंबरअखेर पूर्ण करा : जिल्हाधिकारी

वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सप्टेंबरअखेर पूर्ण करा : जिल्हाधिकारी

• ’दहा कोटी वृक्ष लागवड अभियाना’ अंतर्गत जिल्ह्याला ४३ लाखांचे उद्दिष्ट
कोल्हापूर :
हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत २०२५ या वर्षाकरिता राज्यात ‘दहा कोटी वृक्ष लागवड अभियान’ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यासाठी ४३ लाख ४५ हजारचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात १२ लाख ६० हजार वृक्ष लागवड पूर्ण झाली असून उर्वरित वृक्ष लागवडीचे कामकाज या महिना अखेर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. ’दहा कोटी वृक्ष लागवड अभियाना’ अंतर्गत जिल्ह्याला दिलेल्या ४३ लाखांच्या वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात झालेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, सहाय्यक आयुक्त नगर प्रशासन नागेंद्र मुतकेकर यांच्यासह पोलीस, जिल्हा परिषद, राष्ट्रीय महामार्ग, सहकार, ऊर्जा विभाग, पशुसंवर्धन, वैद्यकीय शिक्षण, रेशीम, कृषी, ग्रामविकास, शालेय शिक्षण, सार्वजनिक बांधकाम अशा सर्व विभागांचे विभाग प्रमुख, प्रतिनिधी उपस्थित होते. तर तालुकास्तरावरून संबंधित विभागांतर्गत विभाग प्रमुख ऑनलाईन प्रणालीद्वारे उपस्थित होते.
राज्यातील वनाच्छदनाची टक्केवारी वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत यावर्षी राज्यात १० कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पुढील वर्षीही दहा कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. वृक्षारोपण ही लोकचळवळ झाली तरच ही मोहीम यशस्वी होईल. त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी बैठकीत दिल्या.
पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक आहे. देशात सर्वाधिक वनाच्छदन वाढविण्यात महाराष्ट्रात अग्रेसर असून यात जिल्ह्याचे योगदान दखलपात्र रहावे यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.  वृक्षारोपणात किमान दिड ते तीन वर्षे वयाची रोपे लावण्यात यावीत. लावलेली झाडे टिकतील, वाढतील यासाठी प्रयत्न व्हावेत. तसेच लावलेल्या वृक्षारोपणाची जगण्याची टक्केवारी वाढावी, यासाठी सूक्ष्म नियोजन करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES
Mumbai
mist
26 ° C
26 °
25.9 °
89 %
1.5kmh
75 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page