कोल्हापूर :
गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर तर्फे प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही कंस्ट्रोसिस करंडक नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर स्मृती राज्यस्तरीय खुली अभिवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. २० आणि २१ सप्टेंबर २०२५ रोजी ही स्पर्धा देवल क्लबच्या सभागृहात होईल.
मराठी भाषेतील कोणतीही संवादात्मक गद्य संहिता यामध्ये सादर करता येईल. १५ सप्टेंबरपर्यंत खासबागेतील देवल क्लबच्या कार्यालयात नावनोंदणी करता येईल. स्पर्धकांनी ७७०९४७११०३ या क्रमांकावर अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.
स्पर्धेमध्ये स्वलिखित अथवा पूर्वप्रकाशित कोणतीही गद्य संहिता वाचता येईल, किमान २ आणि कमाल ८ जणांच्या संघाला भाग घेता य़ेईल, संहिता बघून वाचायची आहे. एका संस्थेकडून एकपेक्षा जास्त संघ येऊ शकतात, परंतु एक वाचक दोन संघात भाग घेऊ शकणार नाही. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोवा येथील संघांनाही यात भाग घेता य़ेईल. या स्पर्धेचे पहिले बक्षीस ५,०००रु असून इतरही अनेक आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
——————————————————-
देवल क्लबमध्ये २० व २१ सप्टेंबरला राज्यस्तरीय खुल्या अभिवाचन स्पर्धा
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
27.6
°
C
27.6
°
27.6
°
69 %
1.2kmh
8 %
Tue
27
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
27
°