Homeशैक्षणिक - उद्योग कोल्हापूरात हेटीचने सुरू केले पहिले एचईएक्स स्टोअर

कोल्हापूरात हेटीचने सुरू केले पहिले एचईएक्स स्टोअर

कोल्हापूर :
हेटीच इंडियाने कोल्हापूरमधील पहिले हेटिच एक्सक्लुझिव्ह (एचईएक्स) स्टोअर सुरू केले आहे. कंपनीने देशभरातील ग्राहकांना आकर्षक इंटिरियर अनुभव देण्यासाठी आपले स्टोअर्स अधिक विस्तारले आहेत. या स्टोअरचे उदघाटन हेटीच इंडियाचे वरिष्ठ प्रतिनिधी जितीन अग्रवाल (चीफ मार्केटिंग ऑफिसर – हेटिच इंडिया, सार्क, मिडल ईस्ट आणि आफ्रिका) आणि फ्रँचायझी पार्टनर विनय पटेल यांच्या उपस्थितीत झाले.
कोल्हापूरसारख्या टियर-२ शहरांमध्ये स्टाईल, आराम आणि आधुनिक डिझाइन यांचा संगम असलेल्या प्रीमियम राहणीमानाची आवड वेगाने वाढत आहे. हे लक्षात घेऊन, हेटीच आपल्या नाविन्यपूर्ण फर्निचर फिटिंग्ज, आर्किटेक्चरल डोअर हार्डवेअर, फर्निचर लाइट्स आणि बिल्ट-इन अप्लायन्सेस ग्राहकांच्या घरांपर्यंत पोहोचवण्याची योजना आखत आहे.
एचईएक्स कोल्हापूर स्टोअरमध्ये ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा असलेला सोल्यूशन-शॉपिंग अनुभव मिळतो. येथे खास तयार केलेले फर्निचर फिटिंग्ज, आर्किटेक्चरल डोअर हार्डवेअर, फर्निचर लाईटिंग आणि बिल्ट-इन किचन अप्लायन्सेस यांचे आकर्षक डिस्प्ले पाहायला मिळतात. या स्टोअरमध्ये फ्री डिझाईन सर्व्हिस देखील उपलब्ध आहे, जिथे प्रोफेशनल डिझाइनर्स ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील घर किंवा जागा प्रत्यक्षात साकारण्यात मदत करतात.
हेटिच एक्सक्लुझिव्ह – नारायणी ट्रेडिंग, ७१२/१० ए वॉर्ड, छत्रपती राजाराम टिंबर मार्केट, कोल्हापूर येथील या नव्या एचईएक्स स्टोअरमध्ये येऊन प्रीमियम प्रॉडक्ट्सचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी हेटीचने ग्राहक व इंटिरियर क्षेत्रातील व्यावसायिकांना आमंत्रित केले आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
27.6 ° C
27.6 °
27.6 °
69 %
1.2kmh
8 %
Tue
27 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
27 °

Most Popular

You cannot copy content of this page