कोल्हापूर :
शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टीपूर्ण कार्य व उल्लेखनीय योगदानाबद्दल संजय घोडावत यांना पुणे येथे आयोजित कार्यक्रमात ‘मिमांसा जीवनगौरव पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल पंकज राव यांच्या हस्ते संजय घोडावत यांनी तो स्वीकारला. यावेळी मिमांसा संस्थेचे संस्थापक नवीन राय उपस्थित होते.
संजय घोडावत ग्रुप, संजय घोडावत विद्यापीठ, संजय घोडावत इन्स्टिट्यूट, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, संजय घोडावत ओलंपियाड स्कूल, संजय घोडावत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी, संजय घोडावत पॉलीटेक्निक कॉलेज, संजय घोडावत जुनियर कॉलेज या सर्व शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जागतिक दर्जाचे उत्कृष्ट शिक्षण घोडावत यांनी उपलब्ध करून दिले आहे. केजी टू पी.एचडी पर्यंतचे सर्व शिक्षण एकाच कॅम्पस मध्ये दिले जाते. अध्ययन आणि अध्यापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि कॅम्पसद्वारे नोकरीच्या जागतिक संधी देण्याचे कार्य संजय घोडावत यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत हा सन्मान त्यांना बहाल करण्यात आला.
संजय घोडावत यांना मिमांसा जीवनगौरव पुरस्कार प्रदान
RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
27.4
°
C
27.4
°
27.4
°
79 %
3.9kmh
24 %
Mon
28
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°