कोल्हापूर :
शिक्षक दिनाचे औचित्य साधून इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन कोल्हापूर तर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षकांचा सन्मान सोहळा सोमवारी (दि. ८) हॉटेल सयाजी येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती इंग्लिश मीडियम स्कूल्स असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष गणेश नायकुडे व कोल्हापूर जिल्हाध्यक्ष के. डी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. अमृता देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित राहणार आहेत. तसेच लोढा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. मंजू लोढा, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. मीना शेंडकर आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ. सुवर्णा सावंत उपस्थित राहणार आहेत. यावेळी पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर करून त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
सन्मान सोहळ्याचे हे चौथे वर्ष आहे. इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन तर्फे घेण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश शिक्षकांचे शैक्षणिक कार्य समाजातील योगदान व विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत असलेले महत्त्व अधोरेखित करणे हा आहे. यावेळी ७ मुख्याध्यापक १८ माध्यमिक व प्राथमिक शिक्षक, प्राचार्य ५ कला व क्रीडा शिक्षक, ११ पूर्व प्राथमिक शिक्षक यांचा सत्कार होणार आहे.
पत्रकार परिषदेला इंग्लिश मीडियम स्कूल्स असोसिएशनचे कोल्हापूर शहराध्यक्ष अमर सरनाईक, सचिव सेक्रेटरी नितीन पाटील, मुख्य समन्वयक सुहेल बाणदार उपस्थित होते.
——————————————————-
इंग्लिश मीडियम स्कूल्स असोसिएशनतर्फे सोमवारी शिक्षकांच्या कार्याचा गौरव
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
29
°
C
29
°
28.9
°
24 %
4.6kmh
0 %
Tue
29
°
Wed
28
°
Thu
29
°
Fri
27
°
Sat
27
°

