कोल्हापूर :
डी. वाय, पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदे येथील मेकॅनिकल विभागाचा विद्यार्थी सिध्दराज अमरसिंह शिंदे याने बालेवाडी (पुणे) येथे पार पडलेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात ६०० पैकी ५३५ गुण संपादन करत धवल यश मिळवले. या कामगिरीच्या जोरावर त्याने पूर्व विभागीय राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेची पात्रता सिद्ध केली असून गोवा येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय खुल्या स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
टेक्निकल कॅम्पसचे डायरेक्टर डॉ. सतिश पावसकर यांनी या यशाबद्दल सिध्दराजचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सिध्दराजची कामगिरी अन्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. आमच्या महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच खेळ व विविध स्पर्धांसाठीही प्रोत्साहन व पाठबळ दिले जाते. त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.
सिध्दराजला विभाग प्रमुख प्रा. एम. एस. फरास व क्रीडा अधिकारी विनोद उतळे यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. एस. आर. पावसकर यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
——————————————————-
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या सिध्दराजचे राष्ट्रीय नेमबाजीत यश
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26.6
°
C
26.6
°
26.6
°
80 %
3.7kmh
100 %
Sun
27
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°