कोल्हापूर :
एका सर्वसामान्य कुटुंबातून निर्माण झालेले अनुभवी नेतृत्व प्रा. जालंदर पाटील यांच्या नियुक्तीचा शेतकरी चळवळीस फायदा होईल, अशा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. शिवसेना अंगिकृत शेतकरी सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी नवनियुक्तीबद्दल प्रा.जालंदर पाटील आणि सचिव जनार्दन पाटील यांचा आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यात लोकप्रिय पक्ष ठरत आहे. समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याची भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठेवली आहे. राज्यातील शेतकरी बांधवांच्या न्यायहक्कासाठी व्यासपीठ निर्माण व्हावे, यातून शेतकरी बांधवांच्या समस्यांचे जलदरितीने निवारण व्हावे, या उद्देशाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शेतकरी सेनेची स्थापना केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्यालाही न्याय देण्याची त्यांची भूमिका आहे.
आ.राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले कि, राजकीय घराणेशाहीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना उच्चविद्याविभूषित असूनही शेती आणि शेतकरी बांधवांसाठी गेली २५ वर्षे संपूर्ण महाराष्ट्रभर एक अभ्यासू वक्ता म्हणून झंजावाती काम केलेल्या प्रा.जालंदर पाटील शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष झाले याचा मला मनस्वी आनंद वाटतो. त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच शेतकरी बांधवांच्या हितासाठी होईल, अशी सदिच्छा देत आ. राजेश क्षीरसागर यांनी प्रा. जालंदर पाटील आणि सचिव जनार्दन पाटील यांच्या भावी कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.
प्रा. जालंदर पाटील यांच्या नियुक्तीचा शेतकरी चळवळीस फायदा होईल : आ. राजेश क्षीरसागर
Mumbai
overcast clouds
26.6
°
C
26.6
°
26.6
°
83 %
4.4kmh
100 %
Sun
28
°
Mon
27
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
26
°