कोल्हापूर :
पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) च्यावतीने आयोजित बीडब्ल्यूएफ, बीए, बीएआय आणि एमबीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सुशांत चिपलकट्टी स्मृती करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स १९ वर्षांखालील बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटात हसना श्री मल्लवरपू, दियंका वाल्डिया, रिशीका नंदी, युझुनो वातानाबे यांनी तर, पुरुष गटात मिथेस रामेश्वरन, जगशेर सिंग खंगुर्रा, तंकारा ज्ञान तलसिला, देव रुपारेलिया, अनिश थोपानी यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवला.
शिवाजीनगर, पुणे येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये दुसऱ्या फेरीत महिला गटात पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या हसना श्री मल्लवरपूने अव्वल मानांकित इशिता नेगीचा २२-२०, २१-१८ असा पराभव करून खबळजनक निकालाची नोंद केली. बिगर मानांकित दियंका वाल्डियाने आठव्या मानांकित तन्वी रेड्डी आंदलुरीचा २१-१५, २१-१९ असा तर, रिशीका नंदीने तेराव्या मानांकित तन्वी पात्रीचा २१-१४, १४-२१, २१-०८ असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. जपानच्या युझुनो वातानाबे हिरेन तैपेईच्या पाचव्या मानांकित जिओ टिंग सुचा २१-१८, २१-१२ असा पराभव केला.
पुरुष गटात भारताच्या मिथेस रामेश्वरन याने नवव्या मानांकित जपानच्या काझुमा कावानोचा २१-१२, २१-१६ असा पराभव केला. भारताच्या जगशेर सिंग खंगुर्रा याने तिसऱ्या मानांकित युएईच्या रियान मल्हानचा २१-१८, २१-१९ असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. भारताच्या तंकारा ज्ञान तलसिलाने दहाव्या मानांकित यूएईच्या ॲडम जेस्लिनचा २१-११, २१-१४ असा तर, भारताच्या देव रुपारेलियाने जपानच्या तेराव्या मानांकित तोशिकी निशियोचे आव्हान २३-२५, २१-१९, २१-०९ असे संपुष्टात आणले. अनिश थोपानीने बाराव्या मानांकित विश्वजीत चौधरीला २१-१४, २०-२२, २१-१९ असे पराभूत केले.
——————————————————-
आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेत नऊ मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26
°
C
26
°
26
°
89 %
5.8kmh
100 %
Sat
27
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
27
°