कोल्हापूर :
पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) च्यावतीने आयोजित बीडब्ल्यूएफ, बीए, बीएआय आणि एमबीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सुशांत चिपलकट्टी स्मृती करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स १९ वर्षांखालील बॅडमिंटन स्पर्धेत गाथा सूर्यवंशी, रेम्या प्रवीण, वंश देव यांनी मानांकित खेळाडूंचा पराभव करून विजयी आगेकूच केली.
पी.ई.सोसायटीज मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये पहिल्या फेरीत महिला गटात महाराष्ट्राच्या गाथा सुर्यवंशी हिने तिसऱ्या मानांकित दुर्गा कांद्रपूचा २२-२०, २१-१५ असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. हा सामना ४५ मिनिटे चालला. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या हसन श्री मल्लवरपूने प्रांजला निसर्गचा २१-१०, १९-२१, २१-१६ असा कडवा प्रतिकार केला. अव्वल मानांकित इशिता नेगी हिने नियती आलोकवर २१-११, २१-११ असा विजय मिळवला.
बिगरमानांकित रेम्या प्रवीण हिने बाराव्या मानांकित अनन्या अग्रवालचा २१-१६, १६-२१, २१-१२ असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. भारताच्या अक्षया चौधरी अलुरू हिने मलेशियाच्या ली के झिनचे आव्हान २१-१७, २१-१७ असे संपुष्टात आणले.
बॅडमिंटन स्पर्धेत गाथा सूर्यवंशी, रेम्या प्रवीण, वंश देव यांची आगेकूच
RELATED ARTICLES
Mumbai
haze
29
°
C
29
°
29
°
70 %
3.1kmh
40 %
Thu
32
°
Fri
28
°
Sat
27
°
Sun
27
°
Mon
28
°