कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (केडीसीए)ची ५७वी वार्षिक सभा हॉटेल ॲट्रीया येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी विविध गटात निवड झालेल्या महिला व पुरुष खेळाडू आणि विविध समित्यांवर निवड झालेल्या माजी खेळाडू तसेच संस्थेच्या सभासदांची विविध संस्थांवर पदाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
स्वागत व सभेचे अहवाल वाचन सेक्रेटरी मदन शेळके यांनी केले. सन २०२४-२५ चा जमा खर्च, ताळेबंद, ऑडीट रिपोर्ट व अंदाजपत्रक खजानिस शीतल भोसले यांनी सभेत सादर केला. याला सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. सन २०२४-२५ अहवाल सालाचा आढावा व असोसिएशनचे पुढील धोरण अध्यक्ष श्री. संभाजीराजे छत्रपती यांनी सभेत व्यक्त केले. असोसिएशनचे पुढील वर्षीचे मुख्य ध्येय हे असोसिएशनला स्वत:च्या मैदानासाठी जागा उपलब्ध करणे हे असून यासाठी विकासवाडी (ता. करवीर) येथील जागेची मागणी लवकरच पुर्णत्वास येणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. पुणे मुंबई नंतर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरात मोठे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभा करण्यात येणार आहे. यासाठी सर्वाचे सहकार्य आवश्यक आहे. यासाठी लवकरच ज्येष्ठ सभासद, उद्योगपती असोसिएशनचे हितचिंतक या सर्वांची फंड उभारणीसाठी कमिटी स्थापन करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
मागील हंगामात कोल्हापूरातील ५ महिला खेळाडू व ४ पुरूष खेळाडूंनी वेगवेगळ्या वयोगटात महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधीत्व केले. तसेच महाराष्ट्र किक्रेट असोसिएशन मार्फत महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जास्तीत जास्त खेळाडूंना स्पर्धात्मक सामने खेळण्यासाठी एमपीएल व डब्लुएमपीएल यासारख्या स्पर्धेेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेसाठी देखील कोल्हापूरातील ७ महिला खेळाडूंची डब्लुएमपीएल व ७ पुरूष खेळाडूंची एमपीएल २०२५ साठी वेगवेगळ्या संघात निवड झाली होती. तसेच कोल्हापूरातील माजी रणजी व जिल्हा संघातील ज्येष्ठ खेळाडूंची महाराष्ट्र राज्य संघ निवड समितीवर निवड झाली हे देखील
अभिमानास्पद आहे. यामध्ये रणजी संघ निवड समिती सदस्यपदी माजी रणजी खेळाडू संग्राम अतितकर, १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघ निवड समिती अध्यक्षपदी अतुल गायकवाड, १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघ निवड समिती सदस्यपदी शैलेश भोसले, कोल्हापूरच्या महिला खेळाडू स्नेहा जामसांडेकर यांची महाराष्ट्र महिला १५, १९ व १७ वर्षाखालील महिला पश्चिम विभाग निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. कोल्हापूरातील खेळाडूंबरोबरच आजी व माजी खेळाडूंना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात आपले कौशल्य सिध्द करण्याची संधी उपलब्ध होत आहे असे सांगितले.
वार्षिक सभेचे औचित्य साधुन संस्थेच्या सभासदांची विविध संस्थेच्या पदाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल त्या सर्वांचा असोसिएशनमार्फत स्मृतीचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला. यामध्ये धनंजय दुग्गे, संजय शेट, ॲड. इंद्रजीत चव्हाण, नरेश चंदवाणी, नीलराजे पंडीत-बावडेकर, शीतल भोसले, अभिजीत भोसले, सतिश घाटगे, आर. ए. (बाळ) पाटणकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे, चेतन चौगुले, दिग्वीजय राजेभोसले, संग्रामसिंह यादव, राजेंद्र मिठारी, सुभाष कापसे, चंद्रकांत भिगार्डे, जवाहर टोणी, अश्विन बेनाडीकर, सुहास कुलकर्णी, आनंदराव माने, उदय घान, संग्राम पाटील, बसवराज खोबरे, रमेश कुसाळे, अलिनिसार जाहगिरदार, जयशील घोरपडे, भवानीसिंग घोरपडे, गिरीष घोलकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ व सभासद उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. संजय पाठारे यांनी केले.
केडीसीएची वार्षिक सभा उत्साहात
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
22
°
C
22
°
22
°
43 %
4.6kmh
0 %
Tue
28
°
Wed
28
°
Thu
29
°
Fri
29
°
Sat
27
°

