कोल्हापूर :
अवघ्या दोन दिवसांवर गणेश चतुर्थी येऊन ठेपली आहे. या सणानिमित्त पूजेसाठी लागणाऱ्या २१ प्रकारच्या पत्रींची व फुलांची सहज उपलब्धता व्हावी, या उद्देशाने भैरोबा वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन समितीतर्फे वृक्षारोपण व संवर्धन मोहीम राबवण्यात आली.
करवीर तालुक्यातील भुये व भुयेवाडी येथील भैरोबा माळावर गेले काही महिने दर रविवारी वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येते. येथील भैरोबा वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन समितीतर्फे रविवारी सकाळी ९ ते १२ या वेळेत भैरोबा टेकडी परिसरात वृक्षसंवर्धनाचा उपक्रम सध्या नियमित सुरू आहे.
रविवारी (दि. २४) या उपक्रमात गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर २१ पत्रींच्या वृक्षांच्या रोपणाची मोहीम उत्साहात राबविण्यात आली. श्री गणेशाला पूजेसाठी आवश्यक असणारी दुर्वा तसेच बेल, धोतरा, शमी, आघाडा, तुळस, केवडा, जाई-जुई, पारिजातक, आवळा, वड, पिंपळ अशा पूजेसाठी आवश्यक २१ पत्रींचे व फुलझाडांचे वृक्षारोपण व संवर्धन करण्यात आले. याशिवाय टेकडीवर नसलेल्या काही महत्त्वाच्या फुलझाडांचेही वृक्षारोपण करण्यात आले. गणेशशोत्सवाच्या काळात भाविकांना पूजेसाठी लागणारी पत्री आणि फुले एकाच ठिकाणी, नैसर्गिकरित्या सहज उपलब्ध होतील, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली.
या उपक्रमात समितीचे समन्वयक अमर पाटील, सुभाष साळोखे, दीपक पाटील, सचिन पाटील, अमर मिसाळ, तुषार पवार, तुकाराम पाटील, शामराव खाडे, रवी खाडे, वेद पाटील, सई पाटील, दिग्विजय पाटील, सौरभ पवार आदींसह भैरोबाभक्त व ग्रामस्थ तसेच बालचमू सहभागी झाले होते.
——————————————————-
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २१ पत्रींच्या वृक्षांच्या रोपणाची मोहीम
Mumbai
smoke
27
°
C
27
°
27
°
57 %
2.6kmh
0 %
Tue
27
°
Wed
28
°
Thu
29
°
Fri
28
°
Sat
27
°

