• रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउन लोककल्याण मंडळला ५१००० रु. देणगी
कोल्हापूर :
कोल्हापूर ऑर्थोपेडिक असोसिएशन, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय व रोटरी क्लब कोल्हापूर मिड टाउन यांचे संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ऑर्थोपेडिक असोसिएशनतर्फे गरजूंना जयपूर फूट प्रदान तसेच हाडांची घनता तपासणी व साठीनंतरचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. याचा लाभ अनेक लाभार्थ्यांनी घेतला.
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउन लोककल्याण मंडळ या संस्थेस ऑर्थोपेडिक असोसिएशनतर्फे ५१००० रुपये देणगी स्वरूपात देण्यात आले. हा धनादेश क्लबचे अध्यक्ष केतन मेहता व लोक कल्याण मंडळचे सचिव अनिकेत अष्टेकर यांनी स्वीकारला.
ऑर्थोपेडिक असोसिएशनतर्फे डॉ. सुरेश देशपांडे, डॉ. भरत कोटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी प्रांतपाल नासिर बोरसदवाला, श्रीनिवास जोशी, सचिन माने, रमाकांत पावसे, सचिन लाड यांच्यासह तिन्ही संस्थांचे प्रतिनिधी व सभासद उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल चव्हाण यांनी केले तर डॉ. संदीप पाटील यांनी आभार मानले.
——————————————————-
ऑर्थोपेडिक असोसिएशनतर्फे गरजूंना जयपूर फूट प्रदान
Mumbai
scattered clouds
27
°
C
27
°
27
°
83 %
5.5kmh
41 %
Sat
27
°
Sun
27
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
27
°