कोल्हापूर :
येथील विवेकानंद कॉलेजच्या भौतिकशास्त्र विभागामार्फत विद्यार्थ्यांनी समाज जागृतीसाठी एक अनोखा उपक्रम हाती घेतला. डॉल्बीच्या आवाजाचे दुष्परिणाम लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यार्थ्यांनी शनिवारु (दि.२३) बिंदू चौक येथे सकाळी ९ ते ११ वाजता पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती केली.
या मोहिमेदरम्यान अनेक नागरिकांनी पोस्टरवरील माहिती वाचून सकारात्मक प्रतिसाद दिला. काहींनी तर या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे मनःपूर्वक स्वागत केले.
यावेळी विभागप्रमुख डॉ. संजय लठ्ठे, डॉ. गणेश नवाथे, डॉ. सुमय्या इनामदार, प्रा. अविनाश गायकवाड, प्रा. अनुरथ गोरे, प्रा. प्रज्ञा पाटील, डॉ. कल्याणी खंडाळे, प्रा. मयुरी बराले तसेच गणेश माने, प्रशांत पाटील, पुंडलिक हरेर आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार आणि अंतर्गत मूल्यमापन हमी कक्षच्या डॉ. श्रुती जोशी तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा सौ. प्राचार्या शुभांगी गावडे, सीईओ कौस्तुभ गावडे आणि प्रबंधक सचिन धनवडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
डॉल्बीच्या आवाजाचे दुष्परिणामबाबत विवेकानंद कॉलेजची जनजागृती
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
34
°
C
34
°
29.9
°
17 %
3.6kmh
1 %
Wed
34
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
27
°
Sun
28
°

