कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन २०२३-२४ साठीच्या क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. दि न्यू कॉलेजने सर्वाधिक १०५२ गुण प्राप्त करीत सलग सातव्या वर्षी प्रथम क्रमांकाचा क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर फिरता चषक, कायमस्वरुपी चषक, प्रमाणपत्र आणि रोख रु. ५० हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले.
क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर चषकाचे सलग सातव्यांदा न्यू कॉलेज मानकरी ठरले. तसेच येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाने ६३४ गुण प्राप्त करीत द्वितीय क्रमांकाचा चषक, प्रमाणपत्र आणि रोख २५ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. तर, गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालय साहित्य, वाणिज्य आणि डी.एस. कदम विज्ञान महाविद्यालयाने ५२४ गुणांसह तृतीय क्रमांकाचा चषक, प्रमाणपत्र आणि रोख १५ हजार रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले. प्राचार्य डॉ. व्ही.एम. पाटील, डॉ. आर.के. शानेदिवाण आणि डॉ. अनिल कुराडे यांनी अनुक्रमे तिन्ही क्रमांकाच्या पारितोषिकांचा स्वीकार केला.
विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. एन. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर किरण पाटील यांनी आभार मानले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. ज्योती जाधव, मानवविज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रघुनाथ ढमकले, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. राहुल मगदूम, अमर सासणे, सुचय खोपडे, डॉ. धनंजय पाटील यांच्यासह पारितोषिक विजेत्या महाविद्यालयांतील क्रीडापटू उपस्थित होते.
——————————————————-
शिवाजी विद्यापीठाचा क्रीडामहर्षी नागेशकर चषक सलग सातव्यांदा न्यू कॉलेजकडे
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
22
°
C
22
°
22
°
43 %
3.1kmh
6 %
Sat
27
°
Sun
26
°
Mon
27
°
Tue
28
°
Wed
28
°

