Homeकला - क्रीडा१३ वर्षाखालील मुला मुलींच्या राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ      

१३ वर्षाखालील मुला मुलींच्या राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ      

                              
कोल्हापूर :
चेस असोसिएशन कोल्हापूरने ब्राह्मण सभा करवीरच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ॲड.पी. आर. मुंडरगी स्मृती एचटूई तेरा वर्षाखालील मुला मुलींच्या महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला. क्लासिकल बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय नियमानुसार स्विस लीग पद्धतीने एकूण आठ फेऱ्यात ही स्पर्धा होत आहे.
मुंबई, पुणे,ठाणे,नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, चंद्रपूर हिंगोली, अमरावती, पालघर, सोलापूर, सांगली, सातारा, परभणी, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, धुळे, जळगाव, लातूर,धाराशिव, गोंदिया, बुलढाणा व स्थानिक कोल्हापूर येथील नामांकित २२० बुद्धिबळपटू सहभागी झाले यापैकी १११ बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत.
स्पर्धेचे उदघाटन कोल्हापूर विभागाचे क्रीडा व युवक सेवा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडाधिकारी कोल्हापूर सौ. विद्या शिरस, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले व ब्राह्मण सभा करवीर मंगलधामचे उपाध्यक्ष डॉ. दीपक आंबर्डेकर यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आली. यावेळी कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण मराठे, चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगुले, पंचगंगा को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष रामचंद्र टोपकर, मंगलधामचे श्रीकांत लिमये, चेस असोसिएशन कोल्हापूरचे उपाध्यक्ष धीरज वैद्य, सचिव मनीष मारुलकर यांच्यासह या स्पर्धेचे मुख्य आंतरराष्ट्रीय पंच सांगलीच्या पौर्णिमा उपळावीकर व राष्ट्रीय पंच आरती मोदी, करण परीट, उत्कर्ष लोमटे, कॅंडिडेट मास्टर अनिश गांधी, आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटे, वरिष्ठ राष्ट्रीय पंच  रवींद्र निकम व रोहित पोळ व प्रशांत पिसे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी  महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले यांनी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचा आढावा घेला. चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगुले यांनी प्रस्तावना करून सर्वांचे स्वागत केले. सांगलीचे वरिष्ठ राष्ट्रीय पंच विजय माने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीनंतर मुलांच्या गटात शाश्वत गुप्ता पुणे, आदित्य कदम मुंबई, विवान सोनी कोल्हापूर, मारस सिंग नागपूर, हित बलदवा कोल्हापूर, तसिन तडवी जळगाव, अभय भोसले कोल्हापूर व कश्यप खाकरीया सांगली यांच्यासह एकूण ३३ जण दोन गुणांसह आघाडीवर आहेत.
मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीनंतर मायशा परवेज मुंबई, भूमिका वागळे छत्रपती संभाजीनगर, इशा घोलप नाशिक, महुआ देशपांडे मुंबई, नाओले जायना अमरावती, सानवी गोरे सोलापूर, शर्वरी देशमुख बुलढाणा, साजिरी देशमुख सातारा, सिद्धी कर्वे कोल्हापूर, आदिना मोहाती पुणे, पृथा ठोंबरे सोलापूर व परिधी गांधी बुलढाणा या ११ जणी दोन गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
27 ° C
27 °
27 °
83 %
5.5kmh
41 %
Sat
27 °
Sun
27 °
Mon
27 °
Tue
27 °
Wed
27 °

Most Popular

You cannot copy content of this page