• पुराच्या पाण्यात वाहन चालवून जीव धोक्यात घालू नका : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासून पावसाची थोडी उघडीप आहे. जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी होत असून कोयना, वारणा, राधानगरी, दूधगंगा या धरणांतून विसर्ग कमी होत असून दोन दिवसात परिस्थिती पूर्ववत होईल, असा अंदाज आहे. अलमट्टीचा विसर्ग वाढवण्याबाबत समन्वय साधण्यात येत आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणी हळूहळू स्थिर होत असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे. तसेच पुराच्या पाण्यात वाहन चालवून जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन करुन स्थलांतरीत पूरबाधित नागरिकांना आवश्यक त्या सोयी सुविधा देण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गुरुवारी पूरबाधित शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, नृसिंहवाडी व हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी भागाची पाहणी करुन ग्रामस्थ व पूरबाधितांशी संवाद साधला. यावेळी इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे, शिरोळचे तहसिलदार अनिलकुमार हेळकर, अपर तहसिलदार महेश खिलारी, गटविकास अधिकारी नारायण घोलप, तालुका आरोग्य अधिकारी पांडुरंग खटावकर, मुख्याधिकारी, सर्व तालुका विभाग प्रमुख व ग्रामस्थ उपस्थित होते.
नृसिंहवाडी दत्त मंदिर परिसरात नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून या भागाची पाहणी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली. तसेच कुरुंदवाडमध्ये श्री दत्त महाविद्यालयातील निवारा केंद्राला भेट देवून पुरामुळे स्थलांतरीत करण्यात आलेल्या पूरबाधित नागरिकांशी संवाद साधला. पूरबाधित नागरिकांना आवश्यक त्या सोयी सुविधा देण्याच्या सुचना त्यांनी यावेळी केल्या. तसेच कुरुंदवाड येथील गोठणपूर या पूरबाधित भागाची पाहणी करुन नागरिकांशी संवाद साधला. पूरबाधितांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या. ‘घाबरु नका, जिल्हा प्रशासन आपल्या सोबत आहे,’ अशा शब्दांत पूरबाधितांना दिलासा देवून पूरपरिस्थितीनुसार जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करा. तसेच पुराच्या पाण्यात वाहन चालवून जीव धोक्यात घालू नका. पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी करु नका, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे, तहसिलदार अनिलकुमार हेळकर यांनी पूरपरिस्थितीची माहिती दिली.
अलमट्टीच्या विसर्गाबाबत समन्वय कायम : जिल्हाधिकारी
Mumbai
smoke
32
°
C
32
°
31.9
°
17 %
4.1kmh
0 %
Thu
32
°
Fri
27
°
Sat
27
°
Sun
28
°
Mon
28
°

