Homeराजकियराहुल पाटील सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

राहुल पाटील सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

कोल्हापूर :
करवीरचे माजी आमदार दिवंगत पी. एन. पाटील यांचे पुत्र व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा केली. सोमवारी (दि. २५) सडोली खालसा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय उच्च शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पी. एन. पाटील गटाच्या कार्यकर्त्यांसह आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी राहुल पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय हा कार्यकर्त्यांचा आहे. भोगावती कारखान्याच्या कर्जासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटलो. त्यावेळी त्यांनी कर्ज मंजुरीची ग्वाही दिली. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी बोलावून घेतले. त्याचवेळी पक्षप्रवेशाचाही पर्याय आमच्यासमोर ठेवला. त्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही हा निर्णय घेतला. पण करवीर मतदारसंघात आमची लढाई नरके गटाविरुद्धच राहणार आहे.
आ. चंद्रदीप नरके हे आमचे पारंपरिक विरोधकच आहेत आणि पुढेही विरोधकच राहतील. करवीर विधानसभा निवडणुकीत आपणच दावेदार असणार आहे, असे सांगतानाच जिल्हा परिषद, पंचायत समिती, गोकुळसह इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकीत पी. एन. पाटील गट म्हणूनच आम्ही सक्रिय राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील, भोगावती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजी पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब पाटील, भारत पाटील, शिवाजी आडनाईक, संदीप पाटील, विजय पाटील आदींसह पी. एन. पाटील गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26 ° C
26 °
26 °
89 %
5.8kmh
100 %
Sat
27 °
Sun
28 °
Mon
27 °
Tue
27 °
Wed
27 °

Most Popular

You cannot copy content of this page