Homeकला - क्रीडा'आतली बातमी फुटली’ चित्रपट सप्टेंबरमध्ये चित्रपटगृहात

‘आतली बातमी फुटली’ चित्रपट सप्टेंबरमध्ये चित्रपटगृहात

कोल्हापूर :
प्रत्येक नात्याची एक गंमत असते… त्यातही नवरा बायकोचं नातं हे अतिशय अनाकलनीय असतं. या नात्यातील रुसवा-फुगवा, अनामिक ओढ दाखवतानाच काही कारणाने याच नात्यात कटुता येऊन जोडीदाराच्या खुनाची सुपारी देण्याची वेळ आलेल्या एका जोडप्याची कथा दाखविणारा  ‘आतली बातमी फुटली’ हा मनोरंजक मराठी चित्रपट १९ सप्टेंबरला राज्यभरात प्रदर्शित होणार आहे.
मराठी चित्रपटांच्या विषयात आणि आशयात अलीकडच्या काळात खूप विविधता दिसून येत आहे. प्रेक्षकांकडूनही वेगळ्या पठडीतल्या सिनेमांचे चांगलं स्वागत होत आहे. प्रसिद्ध कलाकारांची फौज असणारा ‘आतली बातमी फुटली’ हा चित्रपट नेमका कशावर आहे? याविषयीचे तर्क-वितर्क लढवले जातायेत. आशय आणि सादरीकरणाच्या बाबतीत वेगळेपणा दाखवू पाहणाऱ्या ‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटाच्या पोस्टरमधून भेटीला आलेली ही सगळी पात्र लक्ष वेधून घेत आहेत. या चित्रपटामधून नेमका कोणत्या गोष्टीचा रहस्यभेद होणार? याचा उलगडा १९ सप्टेंबरला चित्रपटगृहात होणार आहे.
एका खूनाच्या सुपारीच्या रहस्यभेदाभोवती या सिनेमाची कथा फिरते. ही रंजक कथा दाखवताना उडणारा गोंधळ आणि अनपेक्षित घटनांची धमाल म्हणजे ‘आतली बातमी फुटली’ हा चित्रपट. एका नवरा बायकोच्या नात्यांतील रहस्याचा उलगडा करीत गंमत आणणारी ही कथा  प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची ट्रीट ठरणार आहे. हा कॉमेडी क्राइम सिनेमा धक्कादायक वळण घेत प्रत्येकाला ‘सरप्राईज’ करेल,  असा विश्वास दिग्दर्शक विशाल पी. गांधी यांनी व्यक्त केला.
ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी, अभिनेता सिद्धार्थ जाधव असे मराठीतले नामवंत चेहरे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या तिघांसोबत विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, त्रिशा ठोसर आदि कलाकारांची जमून आलेली भट्टी आणि खिळवून ठेवणारी कथा असलेला ‘आतली बातमी फुटली’  चित्रपट धमाल आणणार आहे. चित्रपटातील ‘सखूबाई’, ‘चंद्राची गोष्ट’ ही दोन्ही गाणी सध्या सोशल माध्यमावर ट्रेंडिंग आहेत.
आतली बातमी फुटली या चित्रपटाची निर्मिती विशाल पी. गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे. सहनिर्माता अम्मन अडवाणी तर सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत. छायांकन अमित सुरेश कोडोथ तर संकलन रवी चौहान यांचे आहे. संगीत एग्नेल रोमन यांनी दिले आहे. कथा जैनेश इजरदार यांनी तर पटकथा जीवक मुनतोडे, अम्मन अडवाणी, जैनेश इजरदार, विशाल पी. गांधी यांची आहे. संवाद लेखन जीवक मुनतोडे, व अद्वैत करंबेळकर यांनी केले आहेत.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26.1 ° C
26.1 °
26.1 °
88 %
5kmh
100 %
Sat
27 °
Sun
28 °
Mon
27 °
Tue
27 °
Wed
27 °

Most Popular

You cannot copy content of this page