कोल्हापूर :
भारताचे पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या ८१व्या जयंतीनिमित्य सद्भावना दौड बुधवारी (दि. २०) सकाळी १० वाजता राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळ येथून निघणार आहे. ही दौड पुढे सीपीआर चौक – दसरा चौक – व्हीन्स कॉर्नर – दाभोळकर कॉर्नर – वटेश्वर महादेव मंदिर – राजीव गांधी पुतळा येथे सांगता होणार आहे.
जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शहर काँग्रेसच्यावतीने स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भाभावना दौड काढण्यात येणार आहे. बुधवार दि. २० ऑगस्ट२०२५ रोजी सकाळी १० वाजता राजर्षि शाहू महाराज समाधीस्थळ येथून सुरु होणाऱ्या या दौडमध्ये कॉग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले आहे.
——————————————————-
स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भाभावना दौड
Mumbai
smoke
28
°
C
28
°
28
°
39 %
2.6kmh
0 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
27
°
Sat
27
°
Sun
28
°

