कोल्हापूर :
ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे हेड कॉटर्स ॲडमिनिस्ट्रेशन स्पर्धा कमिटी सदस्य अमित धारप यांनी कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (केएसए)ला सदिच्छा भेट दिली. केएसएचे जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांनी त्यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत केले.
यावेळी अमित धारप यांना केएसए च्यावतीने फुटबॉल खेळाच्या विकासासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. कोल्हापूरच्या राज परिवाराच्या विशेष सहकार्यामुळे येथील फुटबॉल खेळाची व त्यासाठी संस्थेच्यावतीने सुरू असलेल्या उपक्रमांचे व प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
याप्रसंगी केएसएचे जॉईंट जनरल सेक्रेटरी अमर सासने, फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी व सदस्य नितीन जाधव, संभाजीराव पाटील मांगोरे, विश्वंभर मालेकर, दीपक घोडके उपस्थित होते.
अमित धारप हे स्वतः मॅच कमिशनर असून एआयएफएफच्या आय लीग ॲडमिनिस्ट्रेशनचे प्रमुख आहेत. कोल्हापूरात ते संजीवन स्पोर्ट्स अकॅडमीच्या ॲक्रीडिटेशनची मान्यता देण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारे इन्स्पेक्शन करण्यासाठी आलेले होते.
अमित धारप यांची केएसएला सदिच्छा भेट
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26.3
°
C
26.3
°
26.3
°
86 %
5.5kmh
100 %
Sat
27
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
28
°