कोल्हापूर :
कोणत्याही विषयांमध्ये संशोधन करताना ते नाविन्यपूर्ण व समाजाभिमुख असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मृगेंद्र गुरव यांनी केले. जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्र विभागाच्यावतीने ‘शोधनिबंध कसा लिहावा’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य व रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे हे होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, श्रीमती दिपाली पाटील, डॉ. संदीप वाटेगावकर उपस्थित होते.
संशोधन कसे करावे याविषयी बोलताना मृगेंद्र गुरव पुढे म्हणाले, शोधनिबंध लिहिताना त्या विषयाचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. एखाद्या विषयावर अगोदर संशोधन झाले असले तरी तो विषय नाविन्यपूर्ण पद्धतीने मांडता येतो. संशोधनाला कोणत्याही विषयाचे बंधन नसते. विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळले पाहिजे. आज अनेक नवनवीन क्षेत्रे असून ती संशोधनाची वाट पाहत आहेत. नाविन्यपूर्ण व समाजाभिमुख संशोधनासाठी शासनाकडून अनेक प्रकारच्या निधी उपलब्ध आहेत. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये संशोधनाला प्राधान्य असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेऊन आपल्या ज्ञानात भर घातली पाहिजे. संशोधन करताना संदर्भ कसे द्यावे, आकृत्या, टेबल्स, चार्ट यांचा वापर कसा करावा याची माहिती त्यांनी प्रात्यक्षिकासह दिली.
उपप्राचार्य प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, कोणतेही संशोधन करताना ते केवळ निरीक्षणावरती आधारित न ठेवता त्याला संदर्भाची जोड देणे आवश्यक असते. संशोधनावर आधारित अशा प्रकारची व्याख्याने झाल्यास त्याचा विद्यार्थ्यांना फार मोठा फायदा होणार आहे.
अध्यक्षीय मनोगतून प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे यांनी संशोधनाच्या पद्धतीवर प्रकाशझोत टाकला. पूर्वीच्या काळी कृत्रिम बुद्धिमत्ता अवगत नसल्याने संदर्भ शोधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेतला जात असे. आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिक वापर केला जात असला तरी त्याचा योग्य ठिकाणी वापर करण्यात यावा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदीप वाटेगावकर यांनी केले. पाहुण्यांची ओळख श्रीमती दीपाली पाटील यांनी करून दिली. सूत्रसंचालन निकिता सुर्वे आणि राजेश्वरी कामटे यांनी केले तर आभार प्रियांका जाधव यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूजा जायगुडे, ऋतुजा भोईटे, सोमीनाथ सानप, अजित पांढरे, धनश्री शिर्के, मयुरी सावंत, नवनाथ ठोंबरे, महाविद्यालय विकास समिती सदस्य अनिल सावंत, अनिल लाखे, अनिल बोडरे, चेतन तावरे, शुभम पिसाळ, शिवम सूर्यवंशी सचिन इथापे आणि किशोर पिसाळ आदींनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————-
संशोधनाचा विषय नाविन्यपूर्ण असावा : मृगेंद्र गुरव
RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
27
°
C
27
°
27
°
83 %
5.5kmh
41 %
Sat
27
°
Sun
27
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
27
°