कोल्हापूर :
स्वातंत्र्यदिनाच्या ७९व्या वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी नागरिकांना चांगल्या सेवा देण्याचे आवाहन केले. केएमटीकडील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मंजुर झाल्याची माहिती देत त्यांनी ही कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला मिळालेली विशेष भेट असल्याचे सांगितले.
यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उपआयुक्त कपिल जगताप, परितोष कंकाळ, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, वित्त अधिकारी राजश्री पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, स्वाती दुधाणे, उज्वला शिंदे, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर रचनाकार, एन. एस. पाटील, उपशहर अभियंता सुरेश पाटील, निवास पवार, महादेव फुलारी, अरुण गुजर, नगरसचिव सुनिल बिद्रे, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, कामगार अधिकारी रामचंद्र काटकर, रवका अधिकारी प्रशांत पंडत, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, पर्यावरण अभियंता समिर व्याघ्रांबरे, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेश धोंडगे, कर्मचारी संघाचे समुह संघटक संजय भोसले, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थींनी, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूर महानगरपालिकेत स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण
Mumbai
scattered clouds
27
°
C
27
°
27
°
83 %
5.5kmh
41 %
Sat
27
°
Sun
27
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
27
°