कोल्हापूर :
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच मानसिक, सामाजिक आणि कौशल्यविकास हा आमच्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. पालकांनी आपल्या मुलांशी सकारात्मक संवाद साधत आवश्यक त्या ठिकाणी मार्गदर्शकाची भूमिका घ्यावी. विद्यार्थ्यांनीही मेहनत, शिस्त आणि वेळेचे नियोजन केल्यास यश निश्चित मिळेल असा विश्वास डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. एस. आर. पावसकर यांनी व्यक्त केला.
तळसंदे येथील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी अभिमुखता कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. एस.आर. पावसकर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. पॉलिटेक्निकचे शैक्षणिक कामकाज, मागील वर्षी पॉलिटेक्निकची झालेली यशस्वी कामगिरी, उत्तम प्लेसमेंट रेकॉर्ड यासंदर्भात माहिती त्यानी दिली
‘शाश्वत ज्ञान’ या संस्थेचे संस्थापक आणि सीईओ जिनी जॉर्ज हे प्रमुख मार्गदर्शक होते. विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये सकारात्मक विचार ठेवावा. प्रचंड आत्मविश्वास, मेहनत आणि परिस्थितीची जाणीव असेल तर कोणत्याही कठीण परीस्थितही यश मिळवता येईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी दहावी परीक्षेमध्ये सर्वोत्तम मार्क्स मिळवून डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकला पहिली पसंती देणाऱ्या कॉम्प्युटर विभागाच्या वृषाली पाटील (९५.४०%), इलेक्ट्रिकलच्या लालफेला पाटील (९२.५०%), इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशनच्या गायत्री हसमणीस (८६.८०%), मेकॅनिकलच्या करिष्मा शेट्टी (९२%) तसेच सिव्हिलच्या सायली जगताप (७९.२०%) या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. श्वेता खंकाळ, प्रा.अक्षय खामकर आणि प्रा. एस. वाय. कोळी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विवेक चौगुले आणि आभार प्रदर्शन पॉलिटेक्निकच्या उपप्राचार्या प्रा. कलिका पाटील यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
——————————————————-
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध : डॉ. पावसकर
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
22
°
C
22
°
22
°
60 %
1.5kmh
0 %
Sat
27
°
Sun
27
°
Mon
29
°
Tue
29
°
Wed
29
°

