Homeसामाजिकश्री तिरुपती येथे महाराष्ट्र सदनासाठी राज्य शासनाने पाठपुरावा करावा : आ. क्षीरसागर

श्री तिरुपती येथे महाराष्ट्र सदनासाठी राज्य शासनाने पाठपुरावा करावा : आ. क्षीरसागर

• कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सामान्य प्रशासन विभागास सूचना
कोल्हापूर :
श्री तिरुपती बालाजी मंदिर येथे जाणाऱ्या भाविकांना अनेकवेळा गैरसोयींना सामोरे जावे लागते. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागातून जाणाऱ्या भाविकांना हमखास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या ठिकाणी देशातील अन्य राज्यांचे निवासभवन – भक्तनिवास स्थापन करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी श्री तिरुपती बालाजी दर्शन पास, निवासव्यवस्था, पर्यटन माहिती देणारे महाराष्ट्र राज्याचे सदन स्थापन व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने पाठपुरावा करावा अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, याबाबत तपासून कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या अवर मुख्य सचिवांना दिल्या आहेत.
आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या या निवेदनात पुढे म्हंटले आहे कि, आंध्रप्रदेश राज्यातील तिरुमला येथील श्री तिरुपती बालाजी मंदिर हे प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. या मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यातून लाखो भाविक दरवर्षी जातात. श्री तिरुपती बालाजी मंदिरास भेट देणारे लाखो भाविक कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेण्यास येतात. ही दोन्ही मंदिरे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश दोन्ही राज्यासह संपूर्ण देशभरातील भाविकांचे धार्मिक श्रद्धास्थान आहेत. श्री तिरुपती बालाजी मंदिर येथे जाणाऱ्या भाविकांना तेथे अनेकवेळा गैरसोयींना सामोरे जावे लागते. महाराष्ट्र राज्यातून जाणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर होवून श्री तिरुपती बालाजीचे दर्शन पास सुविधा, निवासव्यवस्था, पर्यटन माहिती देणारे महाराष्ट्र राज्याचे सदन स्थापन होणे आवश्यक आहे.
तशी मागणीही भाविकांमधून गेली अनेक वर्षे होत आहे. याकरिता राज्य शासनामार्फत आंध्रप्रदेश राज्य शासनाकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातून श्री तिरुपती बालाजी, आंध्रप्रदेश येथे जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र सदन स्थापन करणेबाबत शासन स्तरावरून आंध्रप्रदेश शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28 ° C
28 °
28 °
79 %
6.2kmh
100 %
Sun
28 °
Mon
27 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
26 °

Most Popular

You cannot copy content of this page