• कोल्हापूरात २१ ते २३ ऑगस्ट दरम्यान स्पर्धा
कोल्हापूर :
ब्राह्मण सभा करवीर पुरस्कृत ॲड. पी. आर. मुंडरगी स्मृती एच टू ई महाराष्ट्र राज्य १३ वर्षाखालील मुला-मुलींच्या निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा २१ ते २३ ऑगस्ट दरम्यान ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम, बिनखांबी गणेश मंदिराजवळ, कोल्हापूर येथे चेस असोसिएशनने आयोजित केली असल्याची माहिती ब्राह्मण सभा करवीर मंगलधामचे अध्यक्ष डॉ. उदय कुलकर्णी, चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, जागतिक बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धा स्विस् लिग पद्धतीने क्लासिकल आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाच्या नियमानुसार एकूण आठ फेऱ्यात होणार आहेत. या स्पर्धेतून दोन मुलांची व दोन मुलींची निवड गोवा येथे होणाऱ्या अखिल भारतीय १३ वर्षाखालील राष्ट्रीय निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात केली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये मुले आणि मुलींच्या प्रत्येक गटात पहिल्या १० विजेत्यांना एकूण १८ हजार प्रमाणे दोन्ही गटात मिळून एकूण ३६ हजार रूपयांची रोख आणि चषक व मेडल्स बक्षीसे दिली जाणार आहेत. दोन्ही गटातील विजेत्याला रोख चार हजार व चषक उपविजेत्याला रोख अडीच हजार रुपये व चषक तर तृतीय क्रमांकास रोख दोन हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त ७,९ व ११ वर्षाखालील प्रत्येक गटात तीन असे एकूण १८ चषक उत्तेजनार्थ बक्षीेसे आहेत.
१ जानेवारी २०१२ ला किंवा त्यानंतर जन्मलेले फक्त महाराष्ट्रातील मुले व मुली या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून निवड झालेल्या बुद्धिबळपटूस एक हजार रुपये व निवड न झालेल्या बुद्धिबळपटूस दोन हजार रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येकाने महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रवेश फीसह नावनोंदणी करावयाची आहे.
या स्पर्धेसाठी सांगलीच्या आंतरराष्ट्रीय पंच पौर्णिमा उपळाविकर यांची महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने मुख्य पंच म्हणून नियुक्ती केली आहे. स्पर्धा आंतरराष्ट्रीय गुणांकनाच्या होणार असल्याने महाराष्ट्रातील १३ वर्षाखालील बुद्धिबळपटूंना क्लासिकल आंतरराष्ट्रीय गुणांकन मिळण्यासाठी व वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत.
पत्रकार परिषदेला फिडे इन्स्ट्रक्टर मनिष मारुलकर, ब्राह्मण सभा करवीर मंगलधामचे उपाध्यक्ष डॉ. दिपक आंबर्डेकर, कार्यवाह श्रीकांत लिमये, चेस असोसिएशन कोल्हापूरचे उपाध्यक्ष धीरज वैद्य, उत्कर्ष लोमटे, प्रितम घोडके, अनिश गांधी, आरती मोदी व प्रशांत पिसे उपस्थित होते.
१३ वर्षाखालील मुला-मुलींची निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28
°
C
28
°
28
°
79 %
6.2kmh
100 %
Sun
28
°
Mon
27
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
26
°