Homeकला - क्रीडाॲथलेटिक क्रीडा स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल अजिंक्य

ॲथलेटिक क्रीडा स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल अजिंक्य

कोल्हापूर :
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक क्रीडा स्पर्धेमध्ये शानदार कामगिरी करून २३३ गुणांसह एकूण सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. दुसऱ्या क्रमांकावर नेव्ही चिल्ड्रेन स्कूल, गोवा (११३ गुण) तर तिसऱ्या क्रमांकावर न्यू होरायझन पब्लिक स्कूल, ऐरोली, नवी मुंबई (९४ गुण) राहिले.
बक्षीस समारंभ कार्यक्रमासाठी संजय घोडावत विद्यापीठाचे रजिस्टर डॉ. विवेक कायंदे, संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती, बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ. एच. एम. नवीन, डे बोर्डिंग विभागाचे प्राचार्य अस्कर अली हे उपस्थित होते.
या स्पर्धेत महाराष्ट्र आणि गोव्यातील नामांकित सीबीएसई शाळांमधील १२१७ खेळाडूंनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवून अनेक विक्रम प्रस्थापित केले. विजेत्या खेळाडूंना पारितोषिक वितरण समारंभात सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक देऊन गौरविण्यात आले. विजयी खेळाडूंचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
वैयक्तिक विजेते खालीलप्रमाणे :
गट १४ वर्षाखालील मुले : वरदराज जगताप (एसपीएम पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे), सर्वेश पाटील (विबग्योर हाय, उचगाव, कोल्हापूर).
गट १४ वर्षाखालील मुली : ध्रुविका पवार (अग्रसेन विद्या मंदिर, औरंगाबाद), प्रांजल थोरात (केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, पुणे).
गट १७ वर्षाखालील मुले : मोहम्मद अरशद (आर्मी पब्लिक स्कूल, दिघी कॅम्प, पुणे), कौशिक चौधरी (दिल्ली पब्लिक स्कूल, मिहान, नागपूर).
गट १७ वर्षाखालील मुली : अश्वी ताकळे (एसपीएम पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे), वैदेही सुद्रिक (एसएसपीएम श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, मुंबई).
गट १९ वर्षाखालील मुले : अवनीश गोड्डे (ए.एस.एमएस एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल, पुणे), सुमित कुमार बेहरा (आर्मी स्कूल, कुलाबा, मुंबई), सिद्धार्थ गरांडे (पोदार इंटरनॅशनल स्कूल, सांगली).
गट १९ वर्षाखालील मुली : निधी काळे (भवन्स बी.पी. विद्या मंदिर, वाठोदा, नागपूर), रिफात रहमान (शांतिनिकेतन मोरेवाडी, कोल्हापूर), वंदना ठाकूर (जिंदाल विद्या मंदिर, ठाणे).

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
22 ° C
22 °
22 °
60 %
1.5kmh
0 %
Sat
27 °
Sun
27 °
Mon
29 °
Tue
29 °
Wed
29 °

Most Popular

You cannot copy content of this page