Homeकला - क्रीडायंदा युवाशक्ती दहीहंडीचा थरार २४ ऑगस्टला

यंदा युवाशक्ती दहीहंडीचा थरार २४ ऑगस्टला

कोल्हापूर :
धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपच्यावतीने दहीहंडीचा थरार यावर्षी रविवार दि. २४ ऑगस्ट रोजी रंगणार आहे. ऐतिहासिक दसरा चौकात सायंकाळी ४ वाजता युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेला प्रारंभ होईल. पश्‍चिम-दक्षिण महाराष्ट्रातील लोकप्रिय युवाशक्तीच्या दहीहंडी स्पर्धेतील ३ लाख रूपयांचे बक्षिस पटकावण्यासाठी यंदाही गोविंदा पथकांची चुरस रंगणार आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक, उत्तम पाटील, प्रमोद पाटील, सागर बगाडे आदी उपस्थित होते.
खा. धनंजय महाडिक म्हणाले की, स्पर्धेच्या उदघाटनाला राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खा. धैर्यशील माने, आ. विनय कोरे, आ. चंद्रदीप नरके, आ. राहूल आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण दिले जाईल.
यंदाही युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेमधील विजेत्या गोविंदा संघाला ३ लाख रूपयांचे पारितोषिक दिले जाईल. स्पर्धेत सहभागी होणार्‍या प्रत्येक गोविंदा पथकाला प्रोत्साहन देण्यासाठी अन्य बक्षिसांचा दिली जाणार आहेत. पहिल्याच प्रयत्नात पाच थर लावून सलामी देणार्‍या गोविंदा पथकाला प्रोत्साहन म्हणून ५ हजार रूपये दिले जातील. तर सहा थर रचून सलामी देणार्‍या गोविंदा पथकाला १० हजार रूपये आणि सात थर रचून सलामी देणार्‍या गोविंदा पथकाला १५ हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. शिवाय भागीरथी महिला संस्थेकडून सर्व गोविंदा पथकांसाठी फुड पॅकेट वितरीत केले जातेे.
सर्वात वरच्या थरावर चढून, दहीहंडी फोडणार्‍या गोविंदाच्या सुरक्षेेसाठी, याहीवर्षी विशेष सुरक्षेचे उपाय केले जातील. त्यासाठी समीट ॲडव्हेंचरचे विनोद काम्बोज आणि हिल रायडर्स ॲडव्हेंचर फौंडेशनचे प्रमोद पाटील यांचे विशेष सहकार्य आहे. तसेच सीपीआर आणि सिद्धगिरी हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकांसह डॉक्टरांचे पथक सज्ज असेल. सर्व गोविंदांना १० लाख रूपयांपर्यंतचे अपघाती विमा कवच असणार आहे.
प्रारंभी श्रीमंत ढोलताशा पथक आणि सागर बगाडे यांच्या सार्थक क्रिएशनचा सांस्कृतिक कार्यक्राम होईल. शासनाने दहीहंडी खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. त्यानुसार सर्व नियमांचे पालन करून, स्पर्धेचे आयोजन होणार आहे. दहीहंडीचा आनंद आणि थरार अनुभवण्यासाठी कोल्हापूरवासियांनी २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता दसरा चौकात उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24 ° C
24 °
24 °
46 %
2.1kmh
0 %
Tue
29 °
Wed
28 °
Thu
29 °
Fri
28 °
Sat
26 °

Most Popular

You cannot copy content of this page