कोल्हापूर :
महाराष्ट्र स्टेट इंटर डिस्ट्रिक्ट सिनियर वुमन्स फुटबॉल चॅम्पियनशीपसाठी केएसए कोल्हापूर जिल्हा महिला फुटबॉल संघ पालघरला रवाना झाला. कोल्हापूर संघाचा पहिला सामना ११ ऑगस्टला नंदुरबार जिल्हा संघाबरोबर आहे.
केएसएच्या पेट्रन् सौ. मधुरिमाराजे छत्रपती, जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी व सदस्य नितीन जाधव, संभाजीराव पाटील-मांगोरे, मनोज जाधव, दिपक घोडके, प्रदीप साळोखे व प्रशिक्षक अमित शिंत्रे यांनी संघाचे प्रशिक्षक व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा महिला (खुला गट) फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा पालघर येथे ११ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेसाठी केएसए कोल्हापूर जिल्हा महिला फुटबॉल संघ रवाना झाला. या संघासाठी निवड चाचणी व प्रशिक्षण शिबीर कमला कॉलेज येथे घेण्यात आले. केएसए फुटबॉल समितीच्या मार्गदर्शनानुसाार डी लायसन्स प्रशिक्षक रघु पाटील व अमित शिंत्रे यांनी १७ दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये खेळाडूंना तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले व सराव करून घेतला.
संघास केएसएचे पेट्रन इन चीफ शाहू छत्रपती महाराज, संभाजीराजे छत्रपती, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन कार्यकारिणी समिती सदस्य, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्या व विफाच्या महिला समिती चेअरमन सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, ऑन.जॉईंट जनरल सेक्रेटरी अमर सासने व फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी यांचे व केएसए फुटबॉल समितीचे सर्व सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले.
संघातील खेळाडू – स्नेहल सुधिर सुतार व रंजना अशोक कांबळे (गोलरक्षक), सोनाली जयवंत साळवी (कर्णधार), आर्या धनाजी मोरे , भक्ती राम बिरनगड्डी, सानिका दत्तात्रय भोसले, शर्वरी प्रमोद डोणकर, निकिता रामचंद्र मालाडे, अदिती प्रकाश ढेरे, रसिका रमेश साळोखे, सिमरन बादशाह नवलेकर, राजनंदिनी रमेश भोईटे, समिक्षा युवराज मेंगाणे, सानिका काशिनाथ पाटील, श्रृतिका सुहास सुर्यवंशी, साधना राजेंद्र खाडे, श्रृती सचिन ज्यूताल, गौरी अनिल जगताप, रंजना अशोक कांबळे, सुमया अजिज देसाई, ईशिता सचिन जामदार. संघाचे मुख्य प्रशिक्षक रघु पाटील व संघव्यवस्थापक समिक्षा पोवार हे आहेत.
केएसए कोल्हापूर जिल्हा महिला फुटबॉल संघ पालघरला रवाना
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24
°
C
24
°
24
°
46 %
2.1kmh
0 %
Tue
29
°
Wed
28
°
Thu
29
°
Fri
28
°
Sat
26
°

