कोल्हापूर :
बेंगलोर येथे झालेल्या ४१व्या सब ज्युनियर व ५१व्या ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत डायव्हिंग प्रकारात कोल्हापूरच्या जलतरणपटूंनी सुवर्ण व कांस्यपदक पटकावले. इंद्रनील पाटील व नील पाटील यांनी हे संपादन केले.
५ ऑगस्टला बेंगलोर येथे ४१वी सब ज्युनियर आणि ५१वी ज्युनियर राष्ट्रीय जलतरण चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत कोल्हापूरच्या दोन खेळाडूंनी १ सुवर्ण व २ कांस्य पदके जिंकली. राष्ट्रीय स्पर्धेत डायव्हिंग प्रकारात कोल्हापूरला पहिल्यांदाच पदके मिळाली आहेत. गंगापूर (ता. भुदरगड) येथील इंद्रनील दिग्विजय पाटील याने ५ मीटर हायबोर्डमध्ये सुवर्ण तर ३ मीटर स्प्रिंग बोर्ड प्रकारात कांस्य पदक मिळवले. कोल्हापूर शहरातील गंगावेश येथील नील संदीप पाटील याने १ मिटर स्प्रिंग बोर्डमध्ये कांस्य पदक मिळवले. तसेच
शौर्य संदीप पाटील याने स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.
हे सर्व जलतरणपटू पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट येथे दोनवडे (ता. करवीर) च्या अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. हे खेळाडू कोल्हापूर जलतरण संघटनेचे असून त्यांना कोल्हापूर जिल्हा व राज्य जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंद माने यांचे प्रोत्साहन लाभले.
राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत डायव्हिंग प्रकारात कोल्हापूरला सुवर्ण व कांस्यपदक
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26.6
°
C
26.6
°
26.6
°
86 %
4.8kmh
98 %
Fri
26
°
Sat
27
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
27
°