कोल्हापूर :
येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उदघाटन उत्साहात झाले. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर खेळाडूंनी क्रीडा स्पर्धेची शपथ घेतली. सांस्कृतिक नृत्य व स्वागत गीतांने उदघाटन सोहळ्याला रंगत आणली.
सलग तीन दिवस या स्पर्धा चालणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्र व गोव्याच्या १८२ हून अधिक शाळांमधील १२२९ विद्यार्थी खेळाडू सहभागी आहेत. उदघाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सांगलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा हे उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय खेळाडू व पोल व्हॉल्टर सौ. व्ही. एस. सुरेखा, जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. विद्या शिरस, संजय घोडावत शिक्षण समूहाचे चेअरमन व संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, संजय घोडावत शिक्षण समूहाचे विश्वस्त विनायक भोसले, सीबीएसई निरीक्षक प्रमोद पाटील, कोल्हापूर ॲथलेटिक असोसिएशनचे सचिव प्रकुल मांगोरे-पाटील व शाळेच्या संचालिका प्राचार्या सौ. सस्मिता मोहंती हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर खेळाडूंनी क्रीडास्पर्धेची शपथ घेतली. सांस्कृतिक नृत्य व स्वागत गीतांनी उद्घाटन सोहळ्याला रंगत आणली. यावेळी बोलताना प्रणिल गिल्डा यांनी उसेन बोल्टच्या प्रेरणादायी जीवनाचा उल्लेख करत शिस्त, मेहनत व चिकाटीच्या जोरावर यश संपादन करण्याचे महत्व पटवून दिले. ज्याने विश्वविक्रम करण्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत घेतली. खेळाडूंनी ही मूल्ये अंगी बाणवून जीवनात उत्कृष्टता साधावी, असे आवाहन केले.
संजय घोडावत म्हणाले की, या क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना आपली क्रीडाकौशल्ये सादर करण्याची, उच्चस्तरीय स्पर्धेत उतरण्याची आणि संघभावना व क्रीडास्पृहा आत्मसात करण्याची संधी मिळाली. खेळाडूंनी स्वतःला सर्वोत्तम बनवावे, प्रत्येकवेळी शिकत रहावे. अपयश हा यशाचा अडथळा नाही, तो यशाचा भाग आहे. प्रत्येक ॲथलीटने कामगिरी वाढविण्यासाठी सातत्याने कठोर परिश्रम केले पाहिजेत. तसेच ॲथलिट या शब्दाचा अर्थही त्यांनी सांगितला.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती, बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ. एच. एम. नवीन, डे बोर्डिंग विभागाचे प्राचार्य अस्कर अली व सर्व शिक्षक
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये ॲथलेटिक स्पर्धेचे उत्साहात उदघाटन
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26
°
C
26
°
26
°
89 %
5.8kmh
100 %
Sat
27
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
27
°