कोल्हापूर :
टोप संभापूर (ता. हातकणंगले) येथील ३३/११ केव्ही उपकेंद्राचे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते उदघाटन झाले. याचा लाभ कोल्हापूर उद्यम सोसायटी भागधारक तथा परिसरातील संभाव्य औद्योगिक ग्राहकांना लाभ होणार आहे.
यावेळी या महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, कोल्हापूर परिमंडल कार्यालयाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, सीएमडी यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश कोहाट, कोल्हापूर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे आदी उपस्थित होते.
या उपकेंद्राचे काम नवीन सेवा जोडणी योजनेतून करण्यात आले आहे. या उपकेंद्रात १० एमव्हीएचे दोन रोहित्रे बसवण्यात आले असून ६ किमीची भूमिगत उच्चदाब वाहिनी व ७ किमीची उच्चदाब ओव्हरहेड वाहिनी टाकण्यात आली आहे. या उपकेंद्रातून एकूण ३ वाहिन्या निघाल्या आहेत. याचा लाभ टोप संभापूर औद्योगिक वसाहत(उद्यम सोसायटी) येथील ग्राहकांना तसेच शिरोली, वडगाव व अंबप येथील प्रस्तावित औद्योगिक ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. यावेळी लोकेश चंद्र यांच्या हस्ते वृक्षारोपण कऱण्यात आले.
महावितरणच्या टोप संभापूर येथील उपकेंद्राचे उदघाटन
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26
°
C
26
°
26
°
89 %
5.8kmh
100 %
Sat
27
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
27
°