Homeकला - क्रीडासॉफ्टबॉलमध्ये राष्ट्रीय सुवर्णविजेत्या महिला संघाचा विद्यापीठात सत्कार

सॉफ्टबॉलमध्ये राष्ट्रीय सुवर्णविजेत्या महिला संघाचा विद्यापीठात सत्कार

कोल्हापूर :
अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करून परतलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या महिला संघाचे गुरुवारी (दि. ६) विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला.
विक्रम सिंहापुरी विद्यापीठ, नेल्लूर (आंध्र प्रदेश) येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ महिला सॉफ्टबॉल स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या महिला संघाने अंतिम सामन्यात पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीविरुद्ध अत्यंत चुरशीच्या खेळीचे प्रदर्शन करीत २-१ होमरन्सच्या फरकाने सामना जिंकून सुवर्णपदक प्राप्त केले.
विद्यापीठाच्या या महिला सॉफ्टबॉल संघाने सलग दहा सामने जिंकून हे विजेतेपद पटकावले. महिला सॉफ्टबॉलच्या इतिहासात विद्यापीठाला प्रथमच सुवर्णपदक मिळाले आहे. या यशाबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक यांचा विद्यापीठात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, क्रीडा अधिविभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, माजी संचालक डॉ. प्रकाश गायकवाड उपस्थित होते.
संघ प्रशिक्षक म्हणून प्रा. विनायक जाधव, संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. राम पवार यांनी काम पाहिले. विजयी संघ असा- स्वप्नाली चंद्रकांत वायदंडे (कर्णधार), ऐश्वर्या रमेश पुरी, करिष्मा राजू कुडचे, अंजली उमेश पवार, साक्षी दीपक येताळे, मृणाली विजय जाधव, वैष्णवी महादेव हुळहुळे, सृष्टी संतोष शिंदे, सौशज्ञ रवींद्र माने, सागरीका अरुण म्हातो, सलोनी सुरेश नलवडे, सृष्टी निरंजन कदम, अनुजा विष्णू पाटील, श्रावणी विनोद चौगुले, निलोफर सय्यद गोस, सृष्टी संदीप देशमुख.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26.1 ° C
26.1 °
26.1 °
88 %
5kmh
100 %
Sat
27 °
Sun
28 °
Mon
27 °
Tue
27 °
Wed
27 °

Most Popular

You cannot copy content of this page