कोल्हापूर :
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा दि. ७ ते १० ऑगस्टपर्यंत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर पार पडतील. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र व गोवा राज्यातील १७२ सीबीएसई स्कूलमधील १२०० हून अधिक खेळाडू सहभागी होतील, अशी संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती यांनी दिली. यावेळी बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ. एच. एम. नवीन, डे बोर्डिंग विभागाचे प्राचार्य अस्कर अली उपस्थित होते.
प्राचार्या सस्मिता मोहंती म्हणाल्या की, सीबीएसईने सलग बारा वर्षे या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचे यजमानपद आमच्याकडे देऊन विश्वास दाखवला आहे. त्या विश्वासास आम्ही नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न करतो. खेळाडूंसाठी राहण्याची, जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सर्व स्पर्धा निःपक्ष पद्धतीने पार पडतील. सीबीएसई नियुक्त परीक्षक या स्पर्धेसाठी चार दिवस उपस्थित असणार आहेत. या स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सांगली जिल्ह्याचे असिस्टंट कमिशनर पोलीस प्रणिल गिल्डा, संजय घोडावत समूहाचे अध्यक्ष संजय घोडावत, कोल्हापूर जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनचे सेक्रेटरी प्रकुल पाटील-मांगोरे हे उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेचे उदघाटन ७ ऑगस्टला सायंकाळी चार वाजता होईल. तीन दिवस या स्पर्धा शाळेच्या मैदानावर चालणार आहेत. या स्पर्धेसाठी संजय घोडावत शिक्षण समूहाचे विश्वस्त विनायक भोसले यांचेही मार्गदर्शन व सहकार्य आम्हांला मिळत आहे. स्पर्धेसाठी परिपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे.
घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक क्रीडा स्पर्धा
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26.9
°
C
26.9
°
26.9
°
84 %
4.2kmh
99 %
Sat
27
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
28
°
Wed
28
°